*नंदुरबार – रविंद्र गवळे*
बामखेडा (ता.शहादा) येथील ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालयात अमली पदार्थ विरोधी जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ प्रमुख वक्ते व अतिथी म्हणून उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन होऊन संस्थेचे अध्यक्ष पी.बी पटेल यांनी अतिथींच्या सन्मान केला. त्यानंतर प्राचार्य डॉ. एस.पी. पाटील यांनी अमली पदार्थ व त्याचे स्वरूप यावर विचार मांडून प्रास्ताविक केले. पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी ग्रामीण भागात हल्ली अमली पदार्थांचे वाढते सेवन ही चिंतेची बाब असून वेळीच आपण सावध झालो पाहिजे.अन्यथा आपले व देशाचे भविष्य धोक्यात आहे.अमली पदार्थांचे सेवन करून आज आपण अनेक रोग विकत घेत आहोत. व जीवनाचा नाश करीत आहोत. त्यांनी व्यसनांचे अनेक दुष्परिणाम विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट करून उपस्थितांची जाणीव जागृती केली. संस्थेचे अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी ‘एकच प्याला’ या नाटकाचा संदर्भ घेऊन अमली पदार्थांचे दुष्परिणाम श्रोत्यांपुढे मांडले. यावेळी अमली पदार्थांचे सेवन न करण्याची व समाजालाही त्यापासून रोखण्याची प्रतिज्ञा सर्वांना प्रा. एम.एस. निकुंभे यांच्या संयोजनाखाली देण्यात आली. कार्यक्रम सागरंखेडा पोलीस स्टेशन महाविद्यालयीन विद्यार्थी विकास, युवती सभा व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव बी.व्ही.चौधरी तसेच पोलीस कॉन्स्टेबल ठाणसिंग राजपूत पो.काँ.
विजय गावीत, पो.काँ.शानाभाऊ ठाकरे,उपस्थित होते. सूत्रसंचलन विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ.बी.एन. गिरासे यांनी केले तर आभार प्रकटन प्रा. एम. एस. निकुंभे यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.