DPT News Network कोल्हापूर : कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या एका डॉक्टर तरुणीने इंजेक्शनचा ओव्हर डोस घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अपूर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे असं 30 वर्षीय डॉक्टर तरुणीचं नाव आहे. ताराबाई पार्क मधील एका मॉल जवळ पदपथावर या तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची नोंद कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे
30 वर्षीय अपूर्वा हेंद्रे ह्या कसबा बावडा इथल्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. शनिवारी रात्री त्या आपल्या मित्र मैत्रिणीस सोबत पार्टीसाठी गेल्या होत्या. मध्यरात्री दीड वाजता ही पार्टी संपवून त्या घरी पोहोचल्या. पण त्यानंतर अवघ्या काही वेळातच आई वडील आणि भाऊ यांना काहीही न बोलता घरातून निघून गेल्या.
त्यानंतर घरातील कुटुंबीयांनी डॉक्टर अपूर्वा या नेमकं कुठे गेल्या याचा शोध घेतला. पण त्यांना त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी शाहूपुरी पोलीस स्टेशन गाठलं आणि मिसिंग तक्रार दाखल केली. त्यांनतर देखील पोलीस आणि कुटुंबातील सदस्यांनी अपूर्वाचा शोध घेतला.. काही वेळावे घराजवळच असणाऱ्या मॉल शेजारी अपूर्वा या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या.
कुटुंबीयांनी तात्काळ अपूर्वाला शासकीय रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीच अपूर्वाला मृत घोषीत केल. घटनास्थळी पोलिसांना इंजेक्शन मिळून आलं आहे. डॉक्टर अपूर्वाचा मृत्यू इंजेक्शनच्या ओव्हर डोसमुळे झाले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पण आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. ही आत्महत्या आहे की हत्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.