नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जि.प.शाळा.प्रभुदत्तनगर येथे स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव उत्साहात संपन्न.. . . . . .

Dpt news network
शहादा : भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव, जिल्हा परिषद शाळा प्रभू दत्तनगर शाळेच्या रोप्य महोत्सव व 15 ऑगष्ट 2022 असा त्रिवेणी संगमाने स्वातंत्र्य दिन साजरा केला, स्वातंत्र्य म्हणजे खैरात नव्हे स्वातंत्र्य म्हणजे समाजाच्या उन्नती साठी घडवुन आणलेले विधायक कार्य होय 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद मराठी शाळा प्रभू दत्तनगर येथे साजरा करण्यात आला सभेचे प्रमुख आकर्षण म्हणजे ,ज्येष्ठ नागरिक सखाराम शेठ गुजर राहणार गुजर खर्दे तालुका शिरपूर त्यांच्या 84 वा वाढदिवसानिमित्त 85 वृक्ष रोपे शाळेच्या प्रांगणात ग्रामस्थांकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम व संगोपनासाठी ठिबक सिंचनाची सोय करून दिली त्यांचे जावई किशोरभाई चौधरी यांनी परिश्रम घेतले .तसेच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जगदीश पाहूबा बागुल राहणार उभद तालुका कुकरमुंडा जिल्हा तापी गुजरात यांनी शाळेच्या क्रीडांगणातील खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले तसेच माजी पंचायत सदस्या शांताबाई दिलीप पाटील, यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप केले. माजी सरपंच श्रीमती चंद्रभागा ताई ठाकरे. यांच्याकडून सिस्पेंनसील . खोड रबर . शॉपनर वाटप करण्यात आले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व प्रभुदत्त नगर जिल्हा परिषद शाळेला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या रोप्य महोत्सव व शाळेला देणगी दात्यांकडून मिळालेली देणगी असा आगळावेगळा कार्यक्रम साजरा करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष उंटावद गावाचे पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजय तुंबडू पाटील हे लाभले. प्रास्ताविक रामजी विठ्ठल पाटील राहणार प्रभू दत्तनगर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली आणि शाळा सप्टेंबर 1996 स्थापनेपासून आज पर्यंत थोडक्यात काय अडीअडचणी आल्या त्यावर मात करून शाळेला सुजलाम सुफलाम केली विशेष या शाळेत शिकलेले विद्यार्थी आज क्लास वन म्हणून इंजिनिअर डॉक्टर प्राध्यापक अशा पोस्टवर नोकरी करतात अशीच शाळेची प्रगती टिकून राहावी असा गावकऱ्यांच्या ध्यास आहे असे आपल्या प्रास्ताविकात प्रतिपादन केले.कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मानकभाई पुरुषोत्तम चौधरी स्वातंत्र्य व देशभक्ती म्हणजे काय याच्यावर दर्शन घडवून आणलं अगदी साध्या अशा शब्दात. तसेच निवृत्त प्राचार्य ईश्वरभाई चौधरी (अध्यक्ष~ जिज्ञासा फाउंडेशन) यांनी उपस्थितांना आपल्या उमद्या भाषा शैलित पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी चौथ्या क्रांतीची सुरुवात स्वतःच्या परसबागेपासून सुरुवात करून संपूर्ण भारत सीमा रेषा द्वारे कसा हरित करता येईल याचे उदाहरण पटवून दिले हा कार्यक्रम घडवून आणणारे सामाजिक कार्यकर्ते रामजीभाई पाटील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माननीय रमेश सागा पावरा. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली भावसार , केंद्रप्रमुख भावसार सर. अशोक पाटील, गिरधर पाटील. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश पाटील व गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पावरा यांनी केले

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:01 pm, January 13, 2025
temperature icon 25°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 12 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!