प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: शहादा शहरातील पंचशील नगरात घरासमोर उभे असलेले चारचाकी वाहन जाळून साडेचार लाख रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत अधिक माहिती अशी की , शहादा येथील उदयसिंग पांड्या पावरा यांचे मालकीचे चारचाकी वाहन ( एम . एच . ३ ९ , जे . ३३६६ ) पंचशील नगरातील त्यांच्या घरासमोर लावले होते . संशयित शरद अहेर याने द्वेषबुद्धीने काहीतरी ज्वलनशील द्रव्य पदार्थ वाहनावर टाकून पेटवून दिले . यात साडेचार लाख रुपये किंमतीचे वाहन जळून नुकसान केले .
या बाबत उदयसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात संशयित शरद अहेर याच्याविरोधात भादंवि कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक छगन चव्हाण करीत आहेत .