प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: शहरातील बांधकाम व्यवसायीकाची फसवणूक करणाऱ्यास न्यायालयाने 7 वर्ष सश्रम कारावास व 13 लाख 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी कि,
चेतन वसंत धामणे (वय -30 ) रा . प्लॉट नं. 12 ( अ ) . मथुरा किसन नगर , शिरपुर जि . धुळे हे शासकीय बांधकाम कॉन्ट्रॅक्टर असून. जुबेर अली युनुस अली सैय्यद याने चेतन धामणे यांना बांधकाम मटेरीयल होलसेल दराने देतो असे सांगून दि. 04 फेब्रुवारी ते 05 मार्च 2021 रोजी दरम्यान बांधकाम मटेरीयल चे 14 लाख 13 हजार 060 रुपये रोख अॅडव्हान्स मध्ये घेवून बांधकाम मटेरीयल चे साहित्य न देता चेतन धामणे यांची फसवणूक केली म्हणून चेतन धामणे यांच्या तक्रारी वरून दि. 05 ऑगस्ट 2021 रोजी उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 375/2021 भा.द.वि. कलम 406,409,420,504,506 अन्वये जुबेर अली युनुस अली सैय्यद रा . विष्णू नगर , निजामपूर ता .साक्री जि . धुळे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सदर गुन्ह्या बाबत आरोपी जुबेर अली युनुस अली सैय्यद (वय -32) विष्णू नगर , निजामपूर ता . साक्री जि.धुळे यास दि.08 ऑगस्ट 2021 रोजी तात्काळ अटक करण्यात आली होती . पोलीस उप निरीक्षक देविदास सोनवणे यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते . तसेच गुन्हा दाखल झाल्या नंतर जुबेर अली युनुस अली सैय्यद (वय32 )रा . विष्णू नगर , निजामपूर ता.साक्री जि.धुळे याचे विरुद् दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार विनोद चव्हाण यांचे न्यायालयात 59 दिवसात केले होते . मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार यांनी साक्षीदारांचे जबाब , पंच , आणि परिस्थितीजन्य पुरावे तपास अधिकारी यांची साक्ष व सर्व बाबींचा विचार करुन आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असतांनाच खटला चालविण्याचे ठरविले . मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार यांनी अतिशय जलदगतीने खटला चालवुन खटल्याची सुनावणी पुर्ण करुन आरोपी जुबेर अली युनुस अली सैय्यद (वय 32)रा .विष्णू नगर , निजामपूर ता . साक्री जि. धुळे यास आज दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी 07 वर्ष सश्रम कारावास व 13 लाख 02 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे .
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , सहा . पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उप निरीक्षक, देविदास सोनवणे यांनी केला असून न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षा तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड . सुनिल पाडवी यांनी पाहिले होते . पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस हवालदार दिपक डुमकुल यांनी कामकाज केले आहे .
तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच विशेष सरकारी वकील यांचे, पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील,अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी, सचिन हिरे यांनी अभिनंदन केले.