प्रतिनिधी – सुनील कांबळे
मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाविषयीच्या खटल्याची सुनावणी होत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे…
सरन्यायाधीश एनव्ही रमन्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायाधीशांनी शिवसेनेची बाजू ऐकून घेतली आहे. हे प्रकरण आता 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे.
पुढील सुनावणी ही गुरुवारी म्हणजे २५ ऑगस्टला होणार आहे. तसेच, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणुकापूर्वी प्रतिकात्मक मुद्यावर न्यायालयाची तोपर्यंत स्थगित दिली आहे.
धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या मुद्द्यावर आज दुपारी ३ वाजता नियोजित असलेली सुनावणी देखील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.