नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नाशिक
चाचडगाव टोल नाक्याच्या विरोधात सर्वपक्षीय नेते उतरले रस्त्यावर

प्रतिनिधी : शांताराम दुनबळे

नाशिक – पेठ – धरमपुर या राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ वर चाचडगाव नजीक टोलनाका बसवतांना पेठ तालुका वासीयांकडून होणाऱ्या टोल वसुलीच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षभेद विसरून एकत्र येत दोन तासाहून अधिक वेळ रास्ता रोको केला…

नाशिक – पेठ – धरमपुर महामार्गासाठी पेठ तालुकावासीयांनी जमीनी दिल्या आहेत. रस्ता निर्माण कालावधीत प्रचंड त्रास सोसुनही वाहनांचा कर माफ करण्याऐवजी कर आकारणी होत असल्याने अनेक दिवसांपासून येथील नागरिकांचा उद्रेक वाढत होता. त्यामुळे आज सर्वपक्षीय नेत्यांकडून रास्ता रोको करण्यात आला.

तसेच दिंडोरी व पेठचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर आणि पो. उपअधीक्षक अमोल गायकवाड यांच्या समक्ष चर्चा केल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

यावेळी भास्कर गावीत, माजी आमदार धनराज महाले नगराध्यक्ष करण करवंदे, विशाल जाधव, याकुब शेख, जाकीर मनियार, माजी नगराध्यक्ष मनोज घोंगे, विलास अलंबाड, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:10 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!