(प्रतिनिधी :- रमजान मुलानी)
सांगली :- ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचे लाखो रुपये किमतीचे ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने पकडले आहे. चोरट्यांकडून जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर, लिमकन कंपनीचे डबल पल्टी, डिअर कंपनीचे ब्लेड डोझर असा ऐकून तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपीनाथ उत्तम घाडगे (वय ३०),जुना कवलापूर रोड,कोंडके मळा, कुपवाड ता.मिरज, नागराज स्वामसिंग सन्नाळे (वय ३०) जुना कवलापूर रोड, कोंडके मळा,कवलापूर, तेजस चंद्रकांत पाटील (वय २०) कोंडके मळा,कवलापूर, विजय विनायक जाधव रा.लक्ष्मीनगर, सांगली. (भंगार विक्रेता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ट्रॅक्टर चोरीला गेल्याची शेतकरी रमेश अर्जुन बामणे वय ४८ रा.मायाक्कानगर, कवलापूर ता.मिरज,जि.सांगली यांनी पोलिसांकडे तक्रारी केली होती.सदर फिर्यादीच्या तक्रारींवरुन ३१४/२०२२ भादवीस कलम ३७९ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. प्रकरणाच्या तपासांतर्गत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २० ऑगस्ट रोजी आरोपी उत्तम घाडगे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने साथीदारांची नावे सांगितली.त्या आधारावर त्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपी उत्तम घाडगे तसेच त्याचे साथीदारांना नागराज स्वामसिंग सन्नाळे व तेजस चंद्रकांत पाटील अश्या आरोपींनी मिळून सदरचा एम एच ११ यु ६०८० जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर तसेच सोबत असलेला लिमकन कंपनीचे डबल पल्टी, डिअर कंपनीचे ब्लेड डोझर असे चोरी करून ते विजय घाडगे रा.लक्ष्मीनगर, सांगली. (भंगार विक्रेता) यास विकून त्याचे स्क्रॅप मध्ये रूपांतर केले होते.तसेच ट्रॅक्टरचे पाठीमागील व पुढील तयार व त्याच्या आतील ट्यूब काढून ते एमआयडीसी कुपवाड येथील सागर चिंचकर रा.बामणोळी ता.मिरज यांच्या शेड मध्ये ठेवण्यात आले होते.ते देखील जप्त करण्यात आले आहे.असा ऐकून तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मा.पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग, सांगली अजित टिके यांच्या आदेशानुसार तसेच मा.पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रमेश कोळी, साळुंखे, जाधव तसेच सटाले यांनी ही कामगिरीकेली आहे.