48 तासांच्या आत आरोपींना पकडण्यात स्थागुशा व साक्री पोलीसांना यश.
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री :- काका कुटूंबियांना अश्लिल शिवीगाळ करीत होता हि बाब पुतण्याला खुप खटकत होती, मित्राच्या मदतीने त्यास कोडांईबारी घाटात नेवून पुलाच्या खाली फेकून हत्या केल्याचे उघडकीस झाले. पोलिसांनी आरोपी पुतण्या अवेश सलीम शहा (२४) रा. इंदिरा नगर, विसरवाडी जि. नंदुरबार व त्याचा मित्र सोहेल मुबारक शहा(२०) रा. संतोषी माता गल्ली, विसरवाडी जि. नंदुरबार या दोघांना ताब्यात घेतले असुन साक्री पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 11/01/2025 रोजी 12.30 वाजेचे सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.6 नागपूर-सुरत वरील कोंडाईबारी घाटातील खोडयादेव मंदिरासमोरील पुलाचे खालील सुमारे 30 ते 40 फुट खोल दरीत अंदाजे 30 ते 35 वयाचे पुरुषाचे तोंडावर काळा रुमाल व दोन्ही हात-पाय दोरीने बांधलेल्या स्थितीत अनोळखी प्रेत आढळुन आले. त्यावरुन साक्री पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 08/2025 BNS क. 103(1) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटनेचे माहिती मिळताच फॉरेन्सीक, फिंगर ब्युरो, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे व साक्री पोलीस ठाणेची पथके घटनास्थळी पोहोचली. भौगोलिक पुरावे प्राप्त करुन अनोळखी प्रेताची ओळख पटविण्यासाठी व अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे व सहा. पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, साक्री पोलीस ठाणे यांचे स्वतंत्र दोन पथके तयार करुन रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी श्रीराम पवार यांनी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मृताची ओळख पटविण्यासाठी विसरवाडी जि. नंदुरबार येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले. सदर पथकाने विसरवाडी येथे मयताचे फोटो व्हॉटसअॅपवर व्हायरल केले. त्यातुन मयताचे नातेवाईकांनी साक्री येथे ग्रामीण रुग्णालयात येवून खात्री केली असता सईद शहा चिराग शहा फकीर, वय-28 वर्ष, रा.संतोषी माता गल्ली, विसरवाडी जि. नंदुरबार हा असल्याचे निष्पन्न झाले.
मृतकाची माहिती घेतली असता, त्यास दारु पिण्याची सवय होती व तो कुटूंबियांना अश्लिल शिवीगाळ करत असे, ही बाब मयताचे पुतण्यास खुप खटकत असल्याचे तपास पथकास निदर्शनास आले. तसेच मयताचा पुतण्या काळा रुमाल वापरण्याची माहिती देखील समोर आल्यानंतर मयताचा पुतण्या (1) अवेश सलीम शहा, वय-24 वर्ष, व्यवसाय-दुचाकी मॅकेनिक, रा.इंदिरानगर (नवी दिल्ली कॉलनी), विसरवाडी जि. नंदुरबार यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने त्याचा मित्र (2) सोहेल ऊर्फ बबलु मुबारक शहा, वय-20 वर्ष, व्यवसाय-पंक्चर दुकान, रा. संतोषी माता गल्ली, विसरवाडी जि. नंदुरबार याचे मदतीने सदर खुन केल्याची कबुली दिली.
दि.07/01/2025 रोजी दुपारी 12.00 वाजेचे सुमारास मयत सईद शहा चिराग शहा फकीर हा पुन्हा दारु पिवुन आरोपी अवेश सलीम शहा याचे गॅरेजवर आला याचा राग आला. म्हणुन आरोपी अवेश शहा याने दुपारी 02.00 वाजेचे सुमारास त्याची मारोती स्विफ्ट क्रमांक-GJ-15/AD-1533 हिचेत त्याचा काका सईद शहा यास बसविले व सोबत सोहेल मुबारक शहा ऊर्फ बबलु यास घेवुन, कोंडाईबारीकडे निघाले. रस्त्यात अवेश शहा व सोहेल शहा यांनी मयत सईद शहा याचे तोंडावर काळा हातरुमाल बांधुन त्याचे नाक तोंड बंद केले आणि दोन्ही हात व पाय दोराचे सहाय्याने बांधुन जिवंत असतांनाच कोंडाईबारी घाटातील खोड्यादेव मंदिरासमोरील पुलाचे खालील सुमारे 30 ते 40 फुट खोल दरीत फेकुन पुन्हा विसरवाडी येथे घरी परत आल्याची हकीगत सांगितली.
वर नमुद दोन्ही आरोपी व गुन्हयात वापरलेली मारोती स्विफ्ट कार ताब्यात घेवून, पुढील कायदेशीर कार्यवाहीस्तव साक्री पोलीस ठाणे येथे तपास अधिकारी सपोनि. अनिल बागुल यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
अशाप्रकारे अवघ्या 48 तासात मयत सईद शहा चिराग शहा फकीर याची ओळख पटवून, आरोपी मयताचा पुतण्या (1) अवेश सलीम शहा व त्याचा मित्र (2) सोहेल ऊर्फ बबलु मुबारक शहा यांना निष्पन्न करुन साक्री पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 08/2025 BNS क. 103(1) हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोउनि. अमित माळी, साक्री पोलीस ठाणेचे सपोनि. जयेश खलाणे, सपोनि. अनिल बागुल, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे येथील असई. संजय पाटील, पोहेकॉ. संतोष हिरे, पोहेकॉ. सदेसिंग चव्हाण, पोहेकॉ. तुषार सुर्यवंशी, पोकॉ. योगेश जगताप, पोकॉ. सुनिल पाटील, चापोहेकॉ. संजय सुरसे, चापोहेकॉ. कैलास महाजन व चापोकॉ. राजीव गिते व साक्री पोलीस ठाणेचे असई. रामलाल अहिरे, पोहेकॉ. संजय शिरसाठ, पोहेकॉ.शातीलाल पाटील, पोहेकॉ. आनंद चव्हाण, पोकॉ. तुषार जाधव, पोकॉ. प्रमोद जाधव अशांनी केली आहे.