DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- दि.11 जानेवारी रोजी निजामपूर येथील म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष लक्ष्मीकांत भाई शाह यांच्या वाढदिवसानिमित्त रुनमळी गावामध्ये अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. साक्री तालूका रेशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप पवार यांचे भाई यांच्या वरती खूप प्रेम व आदर असून त्यांनी हा अनोखा वाढदिवस साजरा केला.
वयोवृद्धांना आधारासाठी काठी व अल्पहाराचे वाटप करण्यात आले गावातील ग्रामस्थ इतके उत्साहीत होते की काही नागरिकांनी बॅनर मध्ये खर्च करतात तो खर्च न करता गरजूंना मदत करत साहित्य वाटप केले . गावात सगळीकडे भाईंच्या अनोख्या वाढदिवसाची चर्चा झाली. कार्यक्रमासाठी गावातील काही तरुण वर्गनेही योगदान देत उपस्थित वयोवृद्धांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी दिलीप पवार, चंद्रकांत पवार, विश्वास पवार,सचिन पवार, दिगंबर पवार, बाबासाहेब पवार, कैलास बच्छाव, किशोर पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.