प्रतिनिधी
प्रा. भरत चव्हाण
तळोदा -: विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर 29 ऑगस्ट 2022 रोजी पहाटेच्या वेळी ढेकवद गावानजीक नंदुरबारच्या दिशेने जाणारे आर्टिका चारचाकी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन अपघातग्रस्त झाले या अपघातात दोन जण जखमी झाल्यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .
या बाबत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार , नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर आज दि . 29 ऑगस्ट 2022 रोजीच्या पहाटे विसरवाडी गावाकडून नंदुरबार शहराच्या दिशेने जाणारे आर्टिका चारचाकी वाहन ( क्र . जी . जे . 05 , आर . जी . 938 ) ढेकवद गावा जवळ आल्यानंतर एका वाहनावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन आदळले या अपघाताची माहिती कळताच स्थानिक गावकऱ्यांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य केले या अपघातात वाहनातील दोन जण जखमी झाले असून दोघा जखमींवर नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत .