अक्कलकुवा: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सहमतीने तसेच सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने अक्कलकुवा तालुका युवा सेना तालुका प्रमुखपदी निलेश सुरूपसिंग वसावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख आमदार आमश्या पाडवी युवा सेना जिल्हा प्रमुख ललितकुमार जाट यांनी नियुक्तीपत्र दिले आहे. निलेश वसावे हे पोरांबी गावाचे शाखाप्रमुख होते तसेच अनेक वर्षापासून शिवसेनेचे ते निष्ठावंत कार्यकर्ते असून आमदार आमश्या पाडवी यांचे देखील निष्ठावंत आहेत. त्यांच्या या निवडीने तालुक्यातील युवा सेनेचे संघटन अधिक बळकट होणार असल्याने आमदार आमश्या पाडवी तसेच जिल्हाप्रमुख ललितकुमार जाट यांनी अभिनंदन केले . यांच्यासह शिवसैनिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे .