प्रतिनिधी:- प्रविण चव्हाण
नंदुरबार -: मध्यप्रदेश राज्यातुन 6 वर्षीय बालकाला आणुन नंदुरबार शहरात 50 हजाराला विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे .
त्या बालकाचा उपयोग वेठबीगारी म्हणुन करण्यात येत होता .
या प्रकरणी दोघांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , अल्पवयीन बालक रविन गुरलाल ( गोरेलाल ) बारेला ( वय अंदाजे 06 खातला फाटा , मध्यप्रदेश या वर्षे ) रा बालकास मारोती ( पुर्ण नाव गाव माहीत नाही ) याने गुंडा नागो ठेलारी याला वेठबीगारी म्हणुन 50 हजार रुपये देवुन एका वर्षासाठी मेंढ्या चारण्यासाठी दिले .
त्यांनतर गुंडा नागो ठेलारी याने बालकाला मेंढ्या चारण्यासाठी बालकाचा वापर करीत असतांना दि . 4 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील उप प्रादेशीक परीवहन कार्यालया समोर असलेल्या कोळसा डेपो जवळ सार्व . जागी गुंडा नागो ठेलारी हा सदर बालकाकडुन मेंढ्या चारवित असतांना मिळुन आला .
म्हणुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील यांच्या फिर्यादि वरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुंडा नागो ठेलारी धंदा , वय 45 , मेंढपाळ , रा . भोणे ता . जि . नंदुरबार 2 ) मारोती ( पुर्ण नाव गाव माहीत नाही ) यांच्या विरूध्द भादवि कलम 370 ( 4 ) , 374 सह बाल कामगार ( प्रतिबंध आणि वियमन ) अधिनियम 1986 चे कलम 13 14 सह ज्युवेनाईल जस्टीस ( बालकांची काळजी आणि संरक्षण ) कायदा 2015 चे कलम 75,79 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या प्रकरणी पुढील तपास तपास अधिकारी सपोनि नंदा पाटील करीत आहेत .