नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

खून केल्याच्या कारणावरून एकास मारहाण ,
घराची केली तोडफोड…

प्रतिनिधी:- प्रविण चव्हाण



नंदुरबार -: धडगाव तालुक्यातील बिजरीचा वाघबारीपाडा येथे नातेवाईकास जिवेठार केल्याच्या कारणावरुन घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत एकास लाठ्या काठ्यांनी मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , धडगाव तालुक्यातील बिजरीचा वाघबारीपाडा येथील भरत खेमा वळवी यांनी शिवाजी खेमा वळवी यांच्या नातेवाईकास जिवेठार मारले .
या कारणावरुन भरत वळवी यांच्या घरात अनधिकृपणे शिवाजी खेमा वळवी , गुलाब खेमा वळवी , दामा खेमा वळवी , रागा खेमा वळवी , सिमा खेमा वळवी , लालसिंग खेमा वळवी , किशवर शिवाजी वळवी , अनिल भरत वळवी , मालसिंग भरत वळवी सर्व रा . बिजरी ता . धडगाव यांनी लाठ्या काठ्या घेवून शिवीगाळ केली .
तसेच तुम्ही अजून गावातून का गेले नाही आम्ही तुम्हाला राहू देणार नाही असे बोलत घरातील संसारोपयोगी साहित्य बाहेर फेकून घराची तोडफोड करुन नुकसान केले व जिवेठार मारण्याची धमकी दिली .
या बाबत आशा रुमा तडवी यांच्या फिर्यादी वरुन धडगाव पोलिस ठाण्यात ९ जणांविरोधात भादंवि कलम १४३ , १४७ , १४ ९ , ४५२ , ४२७ , ३२३ , ५०४ , ५०६ , महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ ( १ ) ( ३ ) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोना . दीपक वारुळे करीत आहेत .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:21 am, January 14, 2025
temperature icon 20°C
साफ आकाश
Humidity 45 %
Wind 9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!