प्रतिनिधीप्रविण चव्हाण
नंदुरबार -: नंदुरबार शहरातील इसामू नगर बंधारहट्टी येथे घरी पोलिस आल्याच्या राग आल्याने महिलेस शिवीगाळ करीत टरपेंटाईन अंगावर फेकल्याने सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार शहरातील इसामू नगर बंधारहट्टी येथील रुबिना शाह यांच्या घरी पोलिस आल्याच्या राग आल्याने रुकसारबी शाहीद काझी यांना रुबिना शाह , शारीफा शेख , जरीना शेख , अलीम सलीम शेख , कलीम सलीम शेख शाहनवाज शाह यांनी शिवीगाळ केली .
तसेच शारीफा शेख हिने रुकसारबी काझी यांचा उजवा हात पकडल्याने बांगडी फुटून हाताला खरचटले व शाहनवाज शाह याने टपरेंटाईन अंगावर फेकल्याने इन्फेक्शन झाले .
या बाबत रुकसारबी शाहीद काझी यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध भादंवि कलम १४३ , १४८ , १४ ९ , ३२३ , ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोना . संजय मालपुरे करीत आहेत .