प्रतिनिधी अनिल बोराडे
पिंपळनेर (दि. २ ) कर्म आ.मा. पाटील विद्यालय पिंपळनेर येथे ‘राष्ट्रपिता महात्मा गांधीजी’ यांची 153वी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची 117 वी जयंती दिवसानिमित्त निबंध स्पर्धा, व्याख्यान व ‘स्वच्छता अभियान’ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एम. ए. बिरारीस , उपप्राचार्या एम.डी. माळी, उपमुख्याध्यापिका बी.पी. कुलकर्णी, पर्यवेक्षक पी.एच. पाटील, एच.के.चौरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
‘ राष्ट्रपिता महात्मा गांधीजी ‘ यांचा जीवनपट व कार्याची कृतिशील विचारधारा श्रीमती एस. बी. पाटील यांनी मनोगतातून सांगितली. हरित क्रांती व दुग्धक्रातीचे जनक म्हणून ओळखले जाणारे लोकसंग्रही व्यक्तिमत्त्व लालबहादूर शास्त्री होते ,असे प्रतिपादन श्रीमती प्रा. एस. डी. माळी यांनी व्यक्त केले. थोर महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र काम केले. भारत देशाच्या जडणघडणीमध्ये या महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली .देशांमध्ये विविध उपायोजना अमलात आणून देश घडविण्यासाठी बहुमोल असं कार्य करणाऱ्या महान व्यक्तींच्या कार्याची महती प्रा. के .यु .कोठावदे यांनी सांगितली.
सदर दिवसाचे औचित्य साधून “सत्यमेव जयते “ची प्रतिमा प्रा. एच.जे जाधव यांनी विद्यालयास सप्रेम भेट दिली. विद्यालयाच्या परिसरात शालेय स्वच्छता अभियान सर्व पदाधिकारी ,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमार्फत राबविण्यात आले.
अध्यक्ष मनोगतातून विद्यालयाचे प्राचार्य एम. ए. बिरारीस यांनी सांगितले की ,गांधीजींच्या विचारधारेतून निर्माण झालेला आपला भारत देश होय, माणसांमध्ये परिवर्तन करण्याचे काम गांधीजींनी केले . देशाचे संरक्षक व पोषक असलेल्या घटकासाठी ‘जय जवान जय किसान ‘या घोषणेतून जयघोष केला. अशा या थोर महापुरुषांचे स्मरण करावे व त्यांचे विचार आत्मसात करावेत व माणसांमध्ये परिवर्तन घडवावे असे संबोधित केले. अशा या थोर महापुरुषांच्या गुणांचे अनुकरण करून आपण आचरण करावे असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर अहिराव यांनी केले. प्रा.एन डब्ल्यू वाघ यांनी सूत्रसंचालन केले व आभार श्रीमती व्ही.टी. लोहार यांनी मांनले.