पिंपळनेर – येथील अंधश्रद्धा निर्मुलन समिती मार्फत ‘जागर स्त्री शक्तीचा’ या राज्यव्यापी अभियान अंतर्गत ‘नवरंगी संवाद ‘ चे आयोजन करण्यात आले असून त्यात तिसरे पुष्प गुंफताना कर्म आ मा पाटील विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती सुरेखा देसले शिंदे यांनी कौटुंबिक हिंसाचार किती वेदनादायक असतो हे सांगत असताना एक स्त्री तिचे माहेर चे सर्वस्व सोडून येते आणि तिला नवीन कुटुंबाशी जुळवून घ्यावे लागते यावेळी आजही सासू ,नणंद ,ह्या स्रिया असून तिच्या मानसिकतेचा विचार करत नाहीत व तिला त्रास देतात याची काही उदाहरणे त्यांनी दिली आणि म्हणून तिला जर वेळेवर सावरले नाही तर ती मनोरुग्ण बानू शकते एवढ्या खोल मनात तिला जखम होते.त्यांनी स्वतःला वैधव्य आल्यावर जेव्हा पुनर्विवाह केला तर त्यांचे महेर व सासर तुटले आणि समाजानेही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही असे सांगितले.कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी कर्म आ मा पाटील च्या शिक्षिका श्रीमती चेतना सोनवणे गांगुर्डे ह्या होत्या त्यांनी कौटुंबिक हिंसाचार जर होत असेल तर सरळ कायद्याचा आधार घ्यावा असे सांगितले. राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचा पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्रीमती मनीषा भदाणे व रेखा पाटील यांनी जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमाला सुरवात झाली.प्रा शिवप्रसाद शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अनिस चे साथी कैलास बच्छाव यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे आदर्श गुरुजन पुरस्कार मिळाल्याने त्यांचा अनिस तर्फे दादासाहेब आत्माराम सोनू बिरारीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला अनिस अध्यक्ष दादासाहेब सुरेंद्र मराठे,व्ही एन जिरे पाटील,देविदास नेरकर,सुभाष जगताप,प्रा डॉ सुरेश अहिरे व प्रा डॉ एस टी सोनवणे व डी डी महाले व साथी उपस्थित होते.आभार श्रीमती प्रा एम डी माळी यांनी मानले.