प्रतिनिधी अनिल बोराडे
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून साक्री येथील प्रसिध्द डॉक्टर जयवंत अहिरराव तसेच डॉक्टर सौ विजया अहिरराव, स्त्री रोग तज्ञ, सौ. रोशनी पगारे पंचायत समिती सदस्य, सौ. सुनीता सोनवणे पिंपळनेर ग्रामपंचायत सदस्य, लुपिन फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री अनिल गुप्ता,
श्री निलेश पवार, जिल्हा व्यवस्थापक, श्री सुनील सैंदाणे प्रकल्प व्यवस्थापक, श्री. चंदन टोकशा, श्री. कुशावर्त पाटील, श्री दीपक जाधव, श्री संदीप तोरवणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री निलेश पवार यांनी केली यामधील फाउंडेशन अंतर्गत जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा सादर केला.
यानंतर लुपिनचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री अनिल गुप्ता यांनी फाउंडेशनच्या देशभरातील चाललेल्या ग्राम विकासाच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यानंतर फाउंडेशन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध क्रिडा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. लुपिन फाउंडेशनच्या कार्यक्षेत्रात कुटुंब विकासात शाश्वत उपजीविकेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 11 लाभार्थींचा सन्मान देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले त्यामध्ये डॉक्टर जयवंत अहिरराव यांनी हृदयरोग व काळजी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर डॉक्टर सौ विजया अहिरराव यांनी संस्थेने केलेल्या कामाची कौतुक केले व महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी, पोषण आहार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाणे यांनी कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री उमाकांत पाटील, उमाकांत साळुंखे, मनोज एखादे, निलेश देसाई, राकेश खैरनार, दिनेश घरटे व टीमने परिश्रम घेतले.