नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सारंगखेडा हद्दीतून चोरी झालेल्या 57 लाखाचे डंपर स्थानिक गुन्हे शाखेचा ताब्यात
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी चोरट्यांना ठोकल्या बेड्या ; सर्वत्र कौतुक तर पोलीस अधीक्षकांनी तपास पथकास केले बक्षीस जाहीर

नंदुरबार – रविंद्र गवळे
प्रकाशा (ता.शहादा ) येथील रहिवासी असलेले श्री. रऊफ रशिद खाटीक,
यांच्या मालकीचा – टाटा सिम्मा कंपनीचे पांढऱ्या रंगाचे कॅबिन व त्यावर निळया रंगाची बॉडी असलेला 57,00,000/- रुपये किंमतीचा 16 चाकी हायवा (टिपर डंपर) क्रमांक एम.एच. 39 ए.डी. 2227 हा दिनांक 02/09/2022 रोजी पहाटे 03.10 वाजेच्या सुमारास सारंगखेडा गावातील श्रीकृष्ण पेट्रोलपंपवरून कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला म्हणुन त्यांनी सारंगखेडा पोलीस ठाणेला तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा सारंगखेडा पो.स्टे. गुरनं. १६८ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे व मालमत्तेची किमंत देखील खूप मोटी असल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपास करुन मालमत्ता आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबारचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना आदेशीत केले.पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करुन तात्काळ गुजरात, मध्ये प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, राजस्थान इत्यादी राज्यात रवाना केले. सदर हायबामध्ये टाटा कंपनीचे व व्हिलसन कंपनीचे असे दोन जी पी एस
सिस्टीम लावण्यात आलेले असतांना सुध्दा अज्ञात आरोपीतांनी सदर 16 चाकी हायवा चोरी केल्याने
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकापुढे त्यांचा शोध घेणे हे एक मोठे आव्हान होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालकाकडून गाडीमध्ये असलेल्या जी पी एस बाबत माहिती घेतली असता दि.02 सप्टेंबर 2022 रोजी गाडीचे चोरीस गेलेल्या गाडी बाबत माहीती घेतली असता ती सारंगखेडा शहादा निझर या मार्गे गुजरात राज्यातील सुरत येथे गेल्याचे समजले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जी पी एस चा माग काढत सुरत शहर गाठले. जी. पी. एस. सिस्टीमचा माग काढल्यावर सदरचे जी.पी.एस. हे एका आयशर वाहनाच्या वरोल कॅबीनवर आढळून आले. अज्ञात चोरट्यांनी जी.पी.एस. हे शहादा सारंगखेडा या रस्त्यावरून जाणान्या आयशर वाहनावर टाकून तपास पथकाची दिशाभूल केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने सारंगखेडा येथून शहादा, शिरपुर, धुळे या मार्गाच्या सर्व टिकाणांचे उपलब्ध असलेले सर्व सीसीटिव्ही फुटेज प्राप्त करून त्या
आधारे चोरीस गेलेल्या वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सदर वाहन हे सारंगखेडा (ता.शहादा) येथील श्रीकृष्ण पेट्रोलपंप वरून अनरद बारी येथून वळण घेवून शिरपूर रस्त्याकडे गेल्याचे समजले. सदर चोरी गेलेले वाहन हे शिरपूरकडून धुळ्याकडे जातांना दिसले, त्यावरून तपास पथकाला चोरी गेलेले वाहन हे धुळे शहरात असल्याची किंवा धुळ्याकडून चाळीसगावकडे गेल्याचे समजले. तपास पथकाने धुळे चाळीसगाव रस्त्यावरील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता सदर वाहन हे कन्नड- औरंगाबादच्या दिशेने गेल्याचे समजले. औरंगाबाद शहर मोठे असल्याने जालना, सोलापूर, पुणे, मुंबई, नाशिककडे चोरी गेलेले वाहन जाबू शकते. याचा अंदाज घेवून तपास पथकाने प्रचंड मेहनत घेवून सदर वाहन हे औरंगाबाद येथून नाशिकच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाविली. त्यानंतर तपास पथकाने आपला मोर्चा नाशिक शहराकडे वळविला. नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागातील माहिती घेवून ठिक-ठिकाणी पाहणी केली असता चोरीस गेलेल्या वाहनाबाबत कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही. तपास पथकाकडे चोरीस गेलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी कोणतीही तांत्रिक मदत शिल्लक नव्हती. त्यानंतर तपास पथकाने नाशिक शहरातील गॅरेज, चोरीचे वाहन घेणारे सराईत गुन्हेगार, जूने वाहनाचे स्पेअरपार्ट विकत घेणारे विक्री करणारे तसेच वाहनाचे इंजिन नंबर, चेसिस नंबर यात बदल करणारे यांच्याबाबत माहिती घेण्यास सुरूवात केली. नाशिक शहरात ठाण मांडून 20 ते 25 दिवसांपेक्षा अधिक कालावधी होवूनही चोरी गेलेले वाहन व संशयीत आरोपी यांचा कोणताही शोध लागत नसल्याने तपास पथक निराश झाले होते.तपास पथकास गुप्त बातमीदारांकडून मिळत असलेल्या माहितीवर काम करीत असतांना तपास पथकास नाशिक शहरातील राहणारा गुरुमुख सिंग उर्फ बिल्ला हा नाशिक शहरातील चारचाकी वाहने चोरणारा कुख्यात गुन्हेगार असून तो आज पावेतो पोलीसांच्या हाती लागला नसल्याची गोपनिय माहिती मिळाली. गोपनिय बातमीदार स्थानिक पोलीस यांच्याकडे संशयीत गुरुमुख सिंग उर्फ बिल्ला याचा कोणताही फोटो, मोबाईल क्रमांक वा त्याचे वर्णन नसल्याने त्याचा शोध कसा घ्यावा ? हे मोठे आव्हान पोलीस पथकासमोर होते. अखेर पोलीस पथकास पाहिजे असलेली माहिती प्राप्त झाली. गुरुमुख सिंग उर्फ बिल्ला हा मूळ पंजाबी असलेला इसम डोक्यावरील तसेच दाढी मिशीचे केस काढून वेषांतर करून त्याचे पंजाब येथील साथीदारांसह नाशिक शहरातील आडगाव परिसरात चोरी गेलेल्या वाहनाच्या विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली. तपास पथकाने आडगाव परिसरात शोधा-शोध सुरु केल्यावर नाशिक- धुळे महामार्गावर डी-मार्ट समोर एक 16 चाकी हायवा (टिपर डंपर ) उभा असलेला तपास पथकास दिसला. तपास पथकाने चोरी केलेले वाहन तेच आहे याची खात्री करून वाहनात बसलेला इसम यास ताब्यात घेवून विचारपूस केली. वाहनातील संशयीत इसमास ताब्यात घेत असतांना चोरी गेलेल्या वाहनाजवळून एक इंडिका वाहन वेगाने निघून गेली. वाहनातील संशयीत इसमास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मनजित सिंग कशमिर सिंग वय 35 रा. वॉटर सप्लाय गल्ली, लोकल बस स्थानक जवळ, अमृतसर, जिंदलया गुरु, पंजाब राज्य ह.मु. संत जनार्धन अपार्टमेंट, आडगाव नाका, नाशिक असे सांगितले, तर पोलीस पथक आल्याचे पाहून इंडिका वाहनातून गुरुमुख सिंग अमर सिंग संधु उर्फ (बिल्ला) हरि सिंग राजपुत व बलजित सिंग (पुर्ण नाव माहिती नाही) हे पळून गेल्याचे सांगितले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कायदेशीर प्रक्रीया करुन गुन्ह्यातील चोरी गेलेला 57,00,000/ लाख रुपये किंमतीचा हायवा (टिपर- डंपर ) जप्त केला असून गुन्ह्यातील फरार आरोपी गुरुमुख सिंग अमर सिंग संधु उर्फ बिल्ला व त्याचा साथीदार बलजितसिंग यांना देखील लवकरच अटक केली जाईल असे नंदुरबार जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस नाईक पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, विकास कापूरे, पोलीस अमलदार किरण मोरे, यशोदिप ओगले यांच्या पथकाने केली असून मा.पी. आर. पाटील, पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन करुन तपास पथकास बक्षीस जाहीर केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:20 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!