नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांचे हस्ते नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे विविध कार्यक्रम संपन्न…

प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार -: महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर हे दिनांक 17 ते 19 रोजी पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत .
अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांचे हस्ते नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले . रक्तदान शिबीरात नंदुरबार शहरातील विविध सामाजिक संघटना , पोलीस मित्र तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग नोंदविला . सदर रक्तदान शिबीरात एकुण 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले . त्यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी , अंमलदार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी उभारण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन करुन नंदुरबार पोलीस दल पोलीसांसाठी व पोलीस पाल्यांसाठी करीत असलेल्या चांगल्या उपक्रमांचे कौतुक केले . पोलीस ठाणे आवारातच आधुनिक वाचनालय सुरु केल्याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अमंलदारासोबत त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे . तसेच नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना नोंद असलेल्या गहाळ मोबाईल बाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी माहिती घेतली असता मोठ्या प्रमाणावर मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या .
त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात तक्रारदारांनी मोबाईल हरविल्याबाबत दिलेल्या तक्रारींचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषण शाखेने विश्लेषण करुन नंदुरबार , धुळे , जळगांव जिल्ह्यात व गुजरात , मध्य प्रदेश राज्यात जावुन त्यांचा शोध घेवून त्यांचेकडुन मोबाईल हस्तगत करण्यात आले .
हस्तगत करण्यात आलेले 9 लाख 55 हजार रुपये किमंतीचे 100 मोबाईल महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी मुळ तक्रारदारांपैकी 25 तक्रारदारांना प्रातिनिधीक स्वरुपात परत करण्यात आले . हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवून ते प्राप्त करून मुळ तक्रारदारांना परत करण्याच्या कामगिरीत नंदुरबार जिल्हा अग्रेसर राहिला आहे . चोरीस गेलेली मालमत्ता व हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त झाले .
तसेच नंदुरबार जिल्ह्यात दाखल असलेले मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमालापैकी 86,23,135 / – रुपये किमंतीचा 24 गुन्ह्यातील मुद्देमाल महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांच्या हस्ते परत करण्यात आले . ” जेव्हा एखादी दुर्घटना किंवा अपघात होतो त्यावेळेस अत्याधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे त्या व्यक्तीला रक्ताची आवश्यकता असते , परंतु जागरुकतेच्या अभावामुळे कुणीही अपघातग्रस्त इसमाला किंवा गरजु व्यक्तीला रक्तदान करीत नाही परंतु रक्तदान केल्यामुळे कोणाचा जीव वाचत असेल तर निश्चितच रक्तदान करायला हवे . रक्तदान हे खरे जीवनदान असून नियमित रक्तदान केल्याने नवीन रक्त निर्मिती होते जे निरोगी शरीरासाठी फायदेशीर असते . तसेच सर्वसामान्य नागरिकांचा चोरी झालेला मुद्देमाल तसेच हरविलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल त्यांच्या मनाशी निगडीत असतात . त्यामुळे चोरीस गेलेला मुद्देमाल मुळ फिर्यादीस विनाविलंब परत करण्याचा नंदुरबार पोलीस दलाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे .
तसेच असे मुद्देमाल परत करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील राबवावे त्यामुळे जनतेमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास वाढण्यास मदत होईल ” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी मनोगतामध्ये व्यक्त केले .
सदर कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी. संभाजी सावंत , स्थानिक गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर , इतर सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ,
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार उपस्थित होते .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:11 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!