कोट्यवधी रुपयांत शेती केली परस्पर विक्री
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील ८३ वर्षीय वृद्ध महिलेची सुलतानपूर शिवारातील शेती तलाठी असलेल्या लहान मुलाने आईला बँकेचे कर्ज व शेती तारण ठेवण्याचे सांगून परस्पर कोट्यवधी रुपयांना विक्री करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत वृद्ध महिलेने जिल्हाधिकारी मनीषा खत्री, प्रांताधिकारी तसेच शहादा तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले की , शांताबाई छगन मराठे यांच्या शहादा खेतिया रस्त्यावरील सुलतानपुर शिवारातील गट क्र. 158 / 2 / ब / 2. क्षेत्र हे 02-36 आर असून या शेतजमिनीवर 3 एकरांत केळी पिकाचे लागवड केली असुन उर्वरित भागात हरभरे हे पिक पेरले होते. सदर शेतजमिन
खेडत असतांना माझा लहान मुलगा यशवत छगन मराठे हा शिरुड दिगर येथे तलाठी म्हणुन कार्यरत आहे. तसेच त्याचे सासरे माजी मंडळाधिकारी होते व त्याचा शालक प्रविण भाऊराव जगताप यांच्या मदतीने माझी दिशाभुल करून शहादा येथे घेवुन आले व मला त्याने तयार केलेल्या दस्तावर सही करावयास लावली व मला सांगितले की, सदर शेतजमिनीवर कर्ज काढावयाचे आहे आणि बँकेला तारण करून देत आहोत” असे सांगुन माझी फसवणुक करून नमुद शेतजमिनीचे जनरल मुखत्यार लिहुन व नोंदवुन घेतले व त्याआधारे वर नमुद शेतजमिन ही बाजारमुल्याप्रमाणे रक्कम रक्कम 2 कोटी 64 लाख रुपयांना विक्री केली आहे. सर्व पैसे माझा मुलगा यशवंत याने लोभापायी घेतले आहे. मी अशिक्षित व वयोवृध्द स्त्री असुन मला माझे भविष्याचे उदरनिर्वाहासाठी माझ्या पतीकडुन स्त्रीधन म्हणुन मिळालेली शेतजमीन माझा मुलगा यशवंत याने माझी फसवणुक करून परस्पर विकून दिली आहे. माझा भविष्याचा आधार देखील काढुन घेतला आणि माझ्या इतर मुलांना देखील त्याने त्या विक्री केलेल्या मिळकतीपासुन बेदखल केले आहे.
माझा लहान मुलगा यशवंत छगन मराठे व त्याचा शालक हे सरकारी कर्मचारी असल्यावर देखील स्वतःचे आईची फसवणुक केली आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्यांवर योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, माझा मुलगा यशवंत छगन मराठे तसेच त्याचा शालक सब रजिस्टार प्रविण भाऊराव जगताप हे महसुल विभागात नोकरीला असुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून माझी फसवणुक केली आहे. सदर माझा मुलगा व त्याचा शालकाने नव्या कार्यालयाच्या अखत्यारित असल्यामुळे त्यांची योग्य ती चौकशी करून मला न्याय देण्यात यावा , अशी मागणी शांताबाई मराठे (कटारे) यांनी निवेदनातून केली आहे सदर निवेदन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, शहादा पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांना देण्यात आले आहे.