धुळे – सध्या मोबाईलवर वेगवेगळया प्रकारचे बनावट एस. एम. एस. येत आहे. त्याव्दारे हॅकर्स सर्वसामान्य जनतेची आर्थिक व मानसिक छळवणुक करीत आहे. आता एक नविन बनावट एस. एम. एस. मोबाईलवर येत आहे तो म्हणजे “तुमचे बँक अकाऊंट लवकरच बंद होणार आहे” जे लोक ऑनलाईन बँकेच्या सर्वाधिक वापर करतात त्यांना याचा सर्वात जास्त फटका बसत आहे. हे ऑनलाईन बँक अकौंट जर सुरु ठेवायचे असेल तर तुम्हाला हॅकर्स एक लिंक पाठवतात, त्या लिंकला आपण क्लिक करताच आपली वैयक्तिक माहिती विचारली जाते व सदरील लिंक ही एका प्रकारे वायरसचे काम करते जेणेकरुन बॅकधारकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, नेट बँकींगचे डिटेल्स, पासवर्ड, आपले बँकेचे ऑनलाईन डिटेल्स याबाबतचे सगळे अपडेटस् हे या हॅकर्स कडे चालले जाण्याची शक्यता असते. त्याव्दारे हे सायबर गुन्हेगार आपली फसवणूक करतात. जर आपले कुठल्याही प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार असेल तर त्याबाबत सरळ संबंधित बँकेतच चौकशी करावी. कोणतीही बँक ग्राहकाला अशी लिंक पाठवत नाही आणि अशा प्रकारचे जर मॅसेज आले असतील किंवा लिंक आली असेल तर संबंधित बँकेतच जावून त्यासंदर्भात अधिक माहिती घ्यावी. तोपर्यंत अशा कोणत्याही लिंकवर नागरीकांनी क्लिक करु नये व सदरील मॅसेजला प्रतिउत्तर देवू नये. तसेच शक्यतो १५-२० दिवसांनी आपण आपले बँकिंग संदर्भातील पासवर्ड हे बदलत रहावे, फोन मध्ये आपले पासवर्ड, बॅकिंग डिटेल्स इ. माहिती , सेव्ह करू नये किंवा फोन कॉन्टॅक्ट मध्ये देखील आपले बॅकींग डिटेल्स सेव्ह करु ठेवू नये असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.