शिंदखेडा ( बातमीदार – यादवराव सावंत)
शिंदखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत व गावनिहाय सुधारीत पैसेवारी दि. 27 रोजी प्रसिद्ध केलेली असुन सदर पैसेवारी वर ग्रामपंचायत व गावनिहाय हरकती असल्यास 15 दिवसात हरकती घेणेबाबत आदेशीत करण्यात आलेले आहे.त्यानुसार आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली प्रथम शिवाजी चौफुलीवर जाहीर पैसेवारी विरोधी निषेध व्यक्त करण्यात आला व हरकतींवर प्र.तहसिलदार आशा गांगुर्डे यांना पदाधिकारी व शेतकरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. नुकत्याच
दि. 27/10/2022 च्या शिंदखेडा तहसिलदार यांच्या आदेशानुसार 109 गावांची
खरीप पिकांची व 34 गावांची रब्बी पिकांची पैसेवारी प्रसिध्द करण्यात आली. तालुक्यातील मंडळनिहाय सर्वे करून नव्याने पैसेवारी जाहीर करावी यासाठी जाहीर केलेल्या प्रस्तावास (यादीस) आम्ही खालील सह्या
करणारे शेतकरी जाहीर हरकत घेत आहोत. शिंदखेडा तालुक्यातील पर्जन्य परिस्थीती सर्व सर्कल (मंडळात) मध्ये वेगवेगळी आहे. तालुक्यात 92% एवढा पावसाची नोंद झालेली आहे. बन्याच मंडळात खुप कमी पाऊस झालेला असतांना पैसेवारी चुकीची करण्यात आलेली आहे. बन्याच ग्रामपंचायतींनी विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत. संपूर्ण तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतांना पैसेवारीकडे पहाता तालुक्यात “जलमय” वातावरण दाखविण्यात आलेले आहे. याउलट तालुक्यात काही भागात अतिवृष्टी झालेली असतांना या तालुक्याचा अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने कुठलेही मदत अथवा धोरण जाहीर न केल्यामुळे अन्याय केलेला आहे.
म्हणून आम्ही खालील सह्या करणारे शेतकरी व पदाधिकारी या सुधारीत हंगामी पैसेवारी यादीस जाहीर हरकत घेत
असुन अंतिम यादी 50 पैसे पेक्षा कमी आणेवारी जाहीर करण्यात यावी, अन्यथा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन करण्यात येईल.असा इशारा यानिमित्ताने देण्यात आला असून याची प्रशासनाने नोंद घ्यावी ह्या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, माजी पंचायत समिती सभापती प्रा. सुरेश देसले, प्रकाश पाटील, माजी प्र. नगराध्यक्ष दिपक देसले, नगरपंचायत विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, विशाल पवार, पांडूरंग माळी, नरेंद्र पाटील, भाईदास निळे, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. इद्रिस कुरेशी, इरफान खान, नगरसेवक दिपक अहिरे, संदीप थोरात, किरण थोरात, पंकज चव्हाण, सोनू झालसे, पाववा कोळी, संजय माळी, उमेश वाडिले, भाईदास भिल, शामकांत पाटील, निळकंठ पाटील, माधव देवरे, कुलदिप निकम, ए. व्ही पाटील, हेमराज पाटील, प्रविण पाटील, नाना सोनवणे, डॉ. प्रशांत बागूल, जे. जे. बोरसे, गोपाल देवकर, एम. पी. पाटील, हिरालाल धनगर, शिवाजी पाटील, भुपेंद्र भावसार, संजय माळी, रविंद्र गिरासे, मनोज कुवर, भटू माळक्ष, लोटन माळी, गुलाबराव पाटील, रविंद्र माळी अँड. निलेश देसले, पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन नाना चौधरी, कैलास माळी, दिनेश माळी, राकेश देसले, आदी पदाधिकारी सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.