प्रतिनिधी – युवराज पाटील
धुळे : बीड जिल्ह्यातून धुळे मार्गे गुजरातमध्ये काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशनिंग तांदुळाचा ट्रक शहर वाहतूक शाखेने जप्त केला आहे. सविस्तर वृत्त दिनांक 04. 11 .2022 रोजी दुपारी 2.30 वाजे दरम्यान मा. श्री. एस. ऋषिकेश रेड्डी सहाय्यक पोलीस अधीक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे विभाग धुळे यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की मांजलगाव जिल्हा बीड येथून गुजरात राज्यात रेशनिंग तांदूळचा ट्रक क्र.MH.23.W.3495 हा ट्रक काळ्या बाजारात विक्रीसाठी तांदूळ घेऊन जात असल्याची बातमी मिळाली त्यावरून मा. श्री संजय बारकुंड पोलीस अधीक्षक धुळे, मा. श्री. प्रशांत बच्छाव अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. ऋषिकेश रेड्डी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे विभाग सपोनि. संगीता राऊत पोहेकॉ. आरिफ शेख,पोहेकॉ. जितेंद्र आखाडे, पोहेकॉ. भागवत पाटील, चालक सुनील कुलकर्णी सर्व सर्व शहर वाहतूक शाखा धुळे तसेच उपविभागीय कार्यालयातील पोसई. राजेंद्र मांडेकर,पोहेकॉ. कबीर शेख, पोहेकॉ. रमेश उघडे, पोना. चौरे ,पोकॉ. सुनील शेंडे चालक पाटील यांनी सर्वांनी चाळीसगाव चौफुली येथे सापळा रचून वाहने चेक करीत असताना त्यांना तो ट्रक दिसून आला व त्यांनी त्या ट्रक चालकास विचारपूस केली असता ट्रक चालक यांनी उत्तरे दिली. त्या ट्रकला उघडून चेक केले असता त्यात रेशनिंगचा तांदूळ दिसून आल्यावर ट्रक चालक यास ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुरवठा निरीक्षक यांना कळविण्यात आले असून त्याचा तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.