साक्री : साक्री तालुका भाजपा तर्फे आज जिल्हाउपाध्यक्ष भैय्यासो.चंद्रजित सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साक्री तहसिल कार्यालय येथे तहसीलदार साहेबांची भेट घेऊन तालुक्यात येणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी साक्री तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती संदर्भात चर्चा करून ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेती पिकाचे अतोनात नुकसान झाल्या कारणाने त्याचे सरसकट पंचनामे करून आणेवारी ५०% च्या आत आणून शेतकर्यांना शासनातर्फे आर्थिक मदत कशी मिळेल या दृष्टीकोनातून आपण शासन स्तरावर पाऊले उचलावी असे सांगण्यात आले.
दुसऱ्या एका महत्वाच्या विषया संदर्भात चर्चा करत असतांना पी.एम.किसान सन्मान योजने संदर्भात येणाऱ्या नागरिकां मधील अडचणी आपण लवकरात लवकर सोडवून तालुक्यातील लोकांना त्याविषयीचा लाभ मिळवून द्यावा यासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी तहसीलदारांनी दोघाही विषया संदर्भात होकारार्थी उत्तर देऊन हे दोघेही प्रश्न जनतेशी संबंधित असून यावर लवकरात लवकर तोडगा काढून हे प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासीत केले. यावेळी जिल्हासरचिटणीस श्री.शैलेंद्र आजगे,तालुका अध्यक्ष श्री.वेडू आण्णा सोनवणे,सहकार आघाडीचे विभाग संयोजक-श्री.योगेश भामरे,तालुका उपाध्यक्ष श्री.राकेश दहिते,तालुका बूथ संयोजक-श्री.सुरेश शेवाळे,तालुका सोशल मीडिया संयोजक -सागर दहिते,शहर सरचिटणीस-श्री पंकज हिरे,योगेश चौधरी,स्वप्नील भावसार,जितू देसले सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.