Dpt News Network. प्रतिनिधी – मनोहर पाटील
धुळे: धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड व
अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरात अवैध धंदे मुळासकट नष्ट करण्यासाठी शहरातून धडाकेबाज सुरुवात. धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांनी पथके तयार करून पो. नि. संगीता राऊत, यांच्यासह हे. कॉ. चंद्रकांत जोशी हे. कॉ. मंगा शेमले, हे कॉ. रमेश उघडे, हे. कॉ. कबीर शेख, हे. कॉ. आखाडे, हे. कॉ. अरिफ शेख हे. कॉ. सुधीर सोनवणे हे. कॉ. भागवत पाटील, पोना. मोहन पवार, सुनील कुलकर्णी, पो. कॉ. नितीन ओतारी, पो. कॉ. धोंडीराम गुट्टे, पो. कॉ. प्रशांत पाटील पो. कॉ. सुशील शेंडे, पो. कॉ. रवींद्र पावरा यांनी खालील प्रमाणे कारवाया केल्या. दि.07.11.22 रोजी दुपारी 14 वाजेच्या सुमारास धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांना मिळालेल्या बातमीवरून पोलिस अमलदारांचे तीन पथक तयार करून अवैधरित्या अंक सट्याचा जुगार खेळ खेळणारे व खेळवणारे लोकांवर छापा टाकून कारवाई केली आहे.
1) आझाद नगर पोलीस स्टेशन हद्दीत फॉरेस्ट ऑफिस समोर देशमुख हॉस्पिटलच्या आडोशाला 9 इसमांना मिलन व कल्याण नावाचा अंक सट्टा खेळताना कारवाई केली. जुगाराची साधने एकूण 16 हजार 718 रुपये किमतीचा मुद्देमाल चार मोबाईल फोन सह जप्त केले.
2) धुळे शहर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल शेरे पंजाब समोर चौधरी मार्केटच्या खाली 4 इसम देखील मिलन व कल्याण नावाचा अंक सट्टा जुगार खेळताना 1790 रुपये किमतीचा मुद्देमाल सह एक मोबाईल जप्त करण्यात आला.
3) तिसरी कारवाई धुळे शहर पोलीस स्टेशन हद्दीत पाच कंदील फळ मार्केटच्या मागील बोळीत छापा टाकला तेथेही अंक सट्याच्या जुगाराची साधने 7830 रुपये रोकड सह एक इसम मिळून आला आहे.
तसेच या तिघही कारवायांमध्ये एकूण 26,338 रुपये रोख व जुगाराचे साधने तसेच एकूण 17 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. वरील कारवाईबाबत धुळे शहर व आजाद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तसेच धुळे शहरातील सर्व नागरिकांना देखील याद्वारे आव्हान करण्यात आले आहे की शहरात कुठेही वय धंदे सुरू असल्याचे माहिती संबंधित पथकाला कळविल्यास माहित देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.