नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मंत्री अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करा .*
आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी .

DPT NEWS Network
प्रतिनिधी – रमजान मुलानी

आटपाडी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या, संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे यांना पर्यायाने समस्त महिलांना शिवी देणाऱ्या – अपशब्द वापरणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अथवा त्यांना मंत्री मंडळातून बडतर्फ करावे अशी मागणी आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली .
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेधाच्या धिक्काराच्या घोषणा देत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तारांच्या बडतर्फी च्या मागणीचे निवेदन आटपाडीच्या तहसीलदार यांना दिले . अब्दुल सत्तार यांचा निषेध असो, धिक्कार असो. नीमका पत्ता कडवा है अब्दुल सत्तार भडवा है, या सत्तारांचे करायचे खाली मुंडी वर पाय, बडतर्फ करा, बडतर्फ करा, अब्दुल सत्तारांना बडतर्फ करा . सुप्रियाताई सुळे यांचा विजय असो . अशा अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या .
राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, ज्येष्ट नेते विष्णूपंत चव्हाण, महिला राष्ट्रवादी च्या जिल्हा उपाध्यक्षा अनिता पाटील, तालुका अध्यक्षा अश्विनी कासार अष्टेकर, विलासराव नांगरे पाटील इत्यादींच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले .
माध्यमांसमोर संसदपटू महिलेला शिवीगाळ करताना अब्दुल सत्तार यांच्यात पदाचे, परिस्थितीचे, कशाचेच गांभीर्य दिसले नाही . अगदी खालची पातळी गाठणारी भाषा त्यांनी वापरली . त्यातून त्यांची विचारसरणी, महिलां बद्दलचा आदर आणि संकुचित वृत्ती या वक्तव्यातून दिसून आली . शिवीगाळ करणाऱ्या – अपशब्द वापरणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो, निषेध करतो .
आदरणीय सुप्रियाताई सुळे या संसदपटू खासदार आहेत . समाजातील लाखो लोकांचे, महिलांचे त्या प्रतिनिधीत्व करतात . त्यांच्या विषयी शिवीगाळ करणाऱ्या मंत्री अब्दूल सत्तार यांनी तात्काळ माफी मागावी. आणि तातडीने त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा . आणि ते मंत्री पदाचा राजीनामा देणार नसतील तर मुख्यमंत्री महोदयांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना तात्काळ मंत्रीमंडळातून बडतर्फ करावे अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आपणाकडे मागणी करीत आहोत.आमच्या या संतप्त भावनेचा आदर आपण कराल अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे . मुख्यमंत्री महोदयांना लिहीलेल्या या निवेदनाच्या प्रति राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील यांना पाठविण्यात आल्या आहेत . मंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध करणारी रावसाहेबकाका पाटील, हणमंतराव देशमुख, सादिक खाटीक, अनिता पाटील, रुषीकेश गुरव यांची भाषणे झाली
या प्रसंगी
महादेवी लांडगे, उज्वला सरतापे, जालिंदर कटरे, दत्ता यमगर, किशोर गायकवाड, समाधान भोसले , रणजीत चव्हाण पाटील,परशुराम सरक, विश्वतेज देशमुख, महेंद्र वाघमारे, आदिनाथ जावीर, अजय मंडले, रुषीकेश गुरव, धुळाजी ठेंगळे, शरद सोनार राष्ट्रवादी काँग्रेसचे हे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:45 am, January 13, 2025
temperature icon 22°C
साफ आकाश
Humidity 42 %
Wind 6 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!