प्रतिनिधी – अनिल बोराडे
साक्री : तालुक्यातील सामोडे येथील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाच्या जागेवरील घरे रिकामी करण्याच्या नोटीसीमुळे संतप्त नागरिकांनी सामोडे चौफुलीवर ठिय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले.सामोडे ग्रामपंचायत हद्यीत नवीन अप्पर तहसील कार्यालयाची इमारत मंजूर झाली आहे. या जागेवर काही नागरिकांनी घरे बांधली आहेत. ही जागा दहा दिवसाच्या आत रिकामी करावी अशा आशयाची नोटीस साक्री तहसील कार्यालयाच्या आदेशाने सामोडे ग्रामपंचायतीने संबंधित रहिवाशांना सुचना दिल्या.त्यामुळे महसूल विभाग व सामोडे ग्रामपंचायतच्या विरोधात संतप्त नागरिकांनी रविवारी ठीया मांडत संताप व्यक्त केला.अखेर स. पो.नि. सचिन साळुंखे यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढल्यानंतर नागरिक घरी गेले. यापूर्वी माजी मंत्री जयकुमार रावल मा.आमदार डी.एस.अहिरे यांच्या प्रयत्नाने पिंपळनेर येथे बऱ्याच प्रतीक्षेनंतर अप्पर तहसील कार्यालयाची स्थापना झाली. अनेक नागरिकांचे इथून २५ कि.मी.वर असलेल्या साक्री येथील कामे पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधवांचा आणि पंचक्रोशीतील शेतकरी, शेतमजुरांचा वेळ,पैसा व श्रम वाचले.तात्पुरत्या स्वरूपात हे कार्यालय जुन्या सरकारी दवाखान्यात सुरू करण्यात आले.त्यावेळच्या अपर तहसीलदार विनायक थविल यांनी त्यात दुरुस्ती करून विभागवार सुंदर कक्ष स्थापन करून शासकीय सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या.परंतु नवीन अप्पर तहसील कार्यालयाची इमारत व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १९कोटी१३ लाखाचा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकाम प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. आता अप्पर तहसील कार्यालयाची इमारत मंजूर झाली असून त्यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये मंजूर झाल्याचे समजले.ही जागा पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या जवळ असून या जागेवर अनेक दिवसापासून काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. ही जागा महावितरण ,पाटबंधारे व महसूल अशा तीन विभागांची आहे.या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे धुळे व पिंपळनेर यांच्याकडून संयुक्तरित्या पिंपळनेर शहरासाठी मध्यवर्ती अशा प्रशासकीय नवीन तहसील कार्यालय बांधकामाचा प्रस्ताव जानेवारी २०१८ मध्ये तयार करून तो प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता .त्याला मंजुरीही मिळाली.,५हेक्टर ७६आर.ही जागा तहसीलसाठी राखीव आहे. ही जागा सामोडे ग्रामपंचायतच्या हद्दीत असून येथेच नवीन कार्यालयाची इमारत प्रस्तावित आहे.मात्र या जागेवर ४७७ रहिवासी नागरिक राहत आहेत. इमारतीसाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच या ठिकाणी बांधकाम सुरू होईल.मात्र या जागेवर काहींनी घरी बांधल्याने साक्री तहसील कार्यालयाच्या आदेशान्वये सामोडे ग्रामपंचायतीने संबंधित नागरिकांनी दहा दिवसाच्या आत जागा खाली करावी अशा आशयाची नोटीस एका ठिकाणी लावली असून रिक्षावरून लोकांना त्यात४७७ रहिवाशांची नावे आहेत.अशा सर्वांना या जागेवरून हटण्याच्या सूचना केल्या.
ही अतिक्रमित जागा खाली केल्यावर ४७७जणांना बेघर व्हावे लागणार आहे. म्हणून संतप्त रहिवाशांनी रविवारी दुपारी१-३० वाजण्याच्या सुमारास एकत्र येत सामोडे चौफुलीवर रस्त्यावर बसून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला .आम्ही बेघर होऊ म्हणून आक्रोश करीत होते.स.पो.नि.सचिन साळुंखे यांनी महिलांना, नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. महिला ऐकत नसल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.सचिन साळुंखे यांनी पोलीस ठाणे परिसरात जाऊन चर्चेतून मार्ग काढू असे सांगितल्याने महिला नागरिक पोलीस ठाण्यात गेले. त्या ठिकाणी सचिन साळुंखे यांनी आंदोलकांची समजूत काढल्याने वादावर पडदा पडला.दरम्यान नागरिकांनी आमदार मंजुळाताई गावित यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.त्यांनीही सर्व नागरिकांनी एक सामूहिक निवेदन तयार करून मला दिल्यास मी जिल्हाधिकारी महसूल मंत्री ,पालकमंत्री व राज्याचे या विभागाशी संबंधित मंत्री ,मुख्यमंत्री यांना भेटून मार्ग काढू अशी समजूत घातली. आंदोलन कर्ते माघारी फिरले.या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य सागर पानपाटील, भटू पवार ,गौतम पवार,संभाजी अहिरराव,आबा पाथरे , महिला व तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.