साक्री : साक्री तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे नवनिर्वाचित सभापती श्री हर्षवर्धन दहिते यांची बिनविरोध स्तुत्य निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री नारायण पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून निजामपूर जैताणे शिक्षण प्रसारक मंडळाचे शालेय समिती अध्यक्ष श्री अजितचंद्र शाह, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, साक्री नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, पंचायत समितीचे माजी सदस्य वासुदेव बदामे, म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष वेडू सोनवणे, माजी तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, तालुका माजी सरचिटणीस राजेंद्र खैरनार, अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास मोरे, नवडणे विकासो चे चेअरमन भूषण ठाकरे, प्रा. शशिकांत सुतार, ब्राम्हणवेल चे माजी उपसरपंच विलास देवरे व आदींनी श्री. दहिते यांचा नखशीखांत भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, महिर चे सरपंच रमेश सरक, म्हसदी चे माजी सरपंच कुंदन देवरे, मलांजन चे माजी सरपंच ऋषिकेश मराठे, देगाव चे माजी सरपंच सुधीर अकलाडे, साक्री तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, पंचायत समिती सदस्य ललित सोनवणे, किरवाडे चे माजी सरपंच देविदास पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती किरण बच्छाव, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी देवरे, छडवेल पखरूण चे सरपंच सचिन पाटील, माजी उपसरपंच नानासाहेब नांद्रे, उभंड चे माजी सरपंच संजय पाटील, नाडसे चे माजी उपसरपंच दिलीप भामरे, अष्टाण्याचे माजी सरपंच विजय देवरे, साक्री शहर भाजपा उपाध्यक्ष विनोद पगारिया, नगरसेवक दीपक वाघ, शहर सरचिटणीस दीपक कोठावदे, हर्षल बिरारीस, प्रवीण देवरे, धनराज गांगुर्डे, किरण सोनवणे, बाबा पठाण, डॉ.पप्पू खैरनार, विशाल देसले, चारुदत्त बोरसे, अशोक साळुंखे, अतुल दहीते, चेतन जाधव आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाचे सहकार्यवाह विजय भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजपचे तालुका सरचिटणीस प्रदीपकुमार नांद्रे यांनी केले.