DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी – मनोहर पाटील
धुळे : धुळे शहरात नवीन पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक , सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी पदभार घेतल्यानंतर धुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे समूळ नष्ट करण्याचे कामच हाती घेतले आहे.
अशीच एक कारवाई देवपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवपूर परिसरातील चंदन नगरमध्ये चालू असणारे अवैध मिनी गॅस पंप बद्दल धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह चंदन नगर येथे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर चंदन नगर मधील अवैधरित्या गॅस भरणाऱ्या एलपीजी मिनी पंपावर दि. 14.10.2022 रोजी संध्याकाळी 07.00 वाजता छापा टाकला . त्यावेळी तेथे दिपक (भैय्या) चौधरी व इतर इसम हे स्वतःच्या कब्जात भारत गॅस, एचपी गॅस व इंडियन कंपनीचे गॅस सिलेंडर अवैधरित्या कब्जात बाळगून भरवस्तीत धोकादायक रित्या लोकांच्या जिवितास धोका होईल अश्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटारीच्या साह्याने रेगुलेटर व नोझल लावून ऑटो रिक्षामध्ये गॅस भरणा करतांना 7 इसम आढळून आले. त्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले व त्यांच्या ताब्यातील गॅस सिलेंडर रोख रुपये व इलेक्ट्रिक मोटारी इतर मुद्देमाल हस्तगत केला.
मुद्देमाल खालील प्रमाणे
१) १,११०००/- रुपये किमतीचे ३७ रिकामे भारत, इंडियन, एच.पी. कंपनीचे गॅस सिलेंडर प्रत्येकी किंमत ३०००/- रुपये
२) ९२,०००/- रुपये किमतीचे एकूण २३ भरलेले भारत, इंडियन, एच.पी. कंपनीचे गॅस सिलेंडर प्रत्येकी किंमत ४,०००/- रुपये
३) ४,५००००/- किंमतीच्या ०९ ऑटोरिक्षा प्रत्येकी किंमत ५००००/ हजार रुपये
४) ४५,०००/- रुपये किंमतीचे गॅस भरणा करण्यास वापरल्या जाणाऱ्या ०३ इलेक्ट्रिक मोटारी प्रत्येकी किंमत १५०००/- हजार रुपये
५) २०,०००/- रुपये दोन किमतीचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे
६) ३८,२००/- रुपये रोख
असा एकूण ७,५६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करण्यात आला.
सदर कारवाई धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी, सपोनी. संगीता राऊत हेकॉ. कबीर शेख, हेकॉ. रमेश उघडे, हेकॉ. मंगा शिंपले, हेकॉ. चंद्रकांत जोशी, हेकॉ. आरिफ शेख, हेकॉ. जितेंद्र आखाडे, हेकॉ. भागवत पाटील पोना. उमाकांत खापरे, पोना. कर्नल चौरे, पोना. चंद्रकांत पाटील, पोना. नरेंद्र पवार, पोना.गणेश ठाकूर हेकॉ. प्रशांत पाटील पोकॉ. विवेक वाघमोडे , पोकॉ. अतुल पवार, चापोना. प्रसन्नकुमार पाटील, पोका सुशील शेंडे, मपोशि. अकीला शेख मोपोशि. सोनाली बोरसे यांनी केली.
वरील कारवाईबाबत देवपूर पोलीस स्टेशन यथे ईशी ॲक्ट कायद्यान्वये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.