DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी – महेंद्रसिंग गिरासे
शिंदखेडा : शिंदखेडा येथील न्यायालयात महाराष्ट्र राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती शिंदखेडा न्यायालयात लोक न्यायालयाचे आयोजन 12 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या लोकन्यायालयात एकुण 10670 प्रकरणांपैकी 1908 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर तडजोडीतून 64 लाख 27 हजार 304 रुपयांची वसुली करण्यात आली.
लोकन्यायलायचे उदघाट्न दिवाणी न्यायाधीश ए.बी.तहसिलदार सहा. दिवाणी न्यायाधीश एम.आर.कायस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिंदखेडा बार असोशियशन अध्यक्ष अँड.व्ही.ए.पवार उपाध्यक्ष अँड .बी.झेड.मराठे सचिव अँड. व्ही.एल.पाटील सह आदी वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.
लोकन्यायालयात दिवाणी, फौजदारी, बँकेची कर्ज , ग्रामपंचायत वसुली, कौटुंबिक वादाची, बींएसएनएल,विज महावितरणाची समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरची दाखलपूर्व प्रकरणे आपसात समझोत्या करिता 10670 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील 1908 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या लोकन्यायालयातून 64 लाख 27 हजार 304 रुपयांची वसुली करण्यात आली. सदर लोक न्यायालयात पॅनल एक साठी न्यायाधीश ए. बी. तहसीलदार व अँड. सी.आर.बैसाणे तर पॅनल दोन साठी सहा. न्यायाधीश एम.आर.कायस्थ व अँड. जे.ए.पारधी यांनी काम पाहिले.
लोकन्यायालय यशस्वी करणेकामी शिंदखेडा वकील संघाचे सर्व वकील व न्यायालयीन लिपिक अनिल आहुजा, मिलिंद पवार,आर.बी.महाले लघुलेखक राजेश सोनवणे यांच्या सह कर्मचारींनी विशेष परिश्रम घेतले.