DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे येथील महात्मा फुले छात्रालयातील नववीत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी महात्मा फुले छात्रालयात मधली सुट्टी दरम्यान काही विद्यार्थी रुम नंबर ९ मध्ये आपआपल्या जेवणाचे ताट घेण्यासाठी गेले असता. रुमचा दरवाचा आतुन बंद असल्याने विद्यार्थांनी रुमच्या खिडकी मधुन डोकावून बघीतले असता. त्यांना साहिद दिलीप पाडवी रा. साकली उमर ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार हा विद्यार्थ्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला व विद्यार्थ्यांनी लागलीच भयभीत अवस्थेत आपल्या छात्रालयातील व्यवस्थापकांना घडलेली घटना सांगितली व व्यवस्थापकीय अधिका-यांनी लगेचच घडलेल्या घटनेच्या दिशेने धाव घेतली व साहिद ला खाली उतरून जैताणे प्राथमिक रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला तपासून साहिदला मृत घोषित केले. व निजामपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास निजामपुर पोलीस ठाण्याचे ए.एस.आय. वसावे करीत आहे.
*हत्या की आत्महत्या*
साहीद च्या नातेवाईकांनी महात्मा फुले छात्रालयातील व्यवस्थापकीय अधिकारींवर साहीदचा घातपात झाल्याचा संशय केल्यामुळे याप्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. नातेवाईकांनी केलेल्या आरोपामुळे मृतदेहाचे धुळे येथील हिरे सर्वोपचार रूग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आहे. निजामपुर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व पोसई. दिपक वसावे यांनी मृत झालेल्या नातेवाईकांना आश्वासन दिले आहे की शवविच्छेदनात घातपात झाल्याचे स्पष्ट झाले तर साहीद च्या मारेकर्यांचा शोध घेण्यात येईल व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.