DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – अकील शहा
*साक्री :* साक्री तालुक्यातील आमोडे गावातील रहिवासी रवींद्र राणीलाल सूर्यवंशी (३५) या तरुणाने दिनांक ३० नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या पूर्वी कान नदी जवळील एका शेतात असलेल्या लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली , त्यास नातेवाईकांसह ग्रामस्थांनी खाजगी वाहनाने दहीवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील डॉक्टर साळवे यांनी त्यास तपासून रवींद्रला मृत घोषित केले, याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.