DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : साक्री तालुक्यातील भडगाव बारी येथे खाजगी बसचा अपघात झाला या अपघातात लग्नाच्या व-हाडातील वृद्ध महिला व बालिका ठार झाली भडगाव शिवारातून खाजगी बसने (एमएच४१ एजी ९८०५) लग्नाचे व-हाड़ मालेगांव वरुन साक्रीकडे निघाली होती, रस्ता खराब असल्या कारणामुळे भडगाव येथील बारी मध्ये बस उलटली या अपघातात मखमलबाई बारकू व्हयाळीच (रा. सायना ता. मालेगांव जि.नाशिक) व मयुरी विकास बोरसे (रा.शिर्डी.जि.अ.नगर) दोघे मृत झाले. तसेच २५ प्रवासी जखमी झाले त्यात मीराबाई विकास बोरसे, निकिता चेतन सावळे, चित्रा गुलाब सावळे, सुवर्णा मधुकर सावळे , रवीना समाधान सावळे, गायत्री ज्ञानेश्वर सावळे, बापू विठ्ठल सावळे , सरिता अनिल खैरनार , लावण्या रवींद्र चव्हाण, रेश्मा ज्ञानेश्वर सावळे , कुसुम मन्साराम अहिरे आदींचा समावेश आहे जखमींना रुग्णालयात दाखल केली याप्रकरणी मंगेश खैरनार यांच्या तक्रारीवरून बस चालकाविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.