नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आठवडे बाजार मुख्य बाजारपेठेत भरवण्यात यावा ग्रामस्थांनी मागनी सरपंचांना दिले निवेदन

DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – अनिल बोराडे

पिंपळनेर : ग्राम पंचायत पिंपळनेर येथे आठवडे बाजाराच्या दिवशी प्रमुख रहदारीच्या मार्गांवर भरणारा बाजार मुख्य बाजार पेठेत स्थलांतर करावा या विषयावर मा.सरपंच श्री देविदास सोनवणे,सदस्य प्रमोद गांगुर्डे,योगेश बधान यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले.गेल्या काही वर्षांपासून मुख्य बाजार पेठेत भरणारा बाजार हा गावात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर भरत असून त्या मुळे आठवडे बाजाराच्या दिवशी गावात काही गंभीर घटना मयत,आजारपण असा प्रसंग उद्भवल्यास गावातील नागरिकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.विशेषतः पंचमुखी कॉर्नर ते सुभाष चौक व साई बाबा मंदिर ते वर्धमान पतसंस्था या गावात जाणाऱ्या प्रमुख रहदारिच्या मार्गांवर अत्यंत बेशिस्तपणे पथारी व हातगाडी व्यवसायिक दुकाने लावून बसलेले असतात याचा त्रास गावातील नागरिकांना होत आहे तरी ग्रामपंचायत प्रशासनाने या विषयाची दखल घेऊन या रत्यांवर बसणारा बाजार स्थलांतर करावा अशी मागणी करण्यात आली.या वर सकारात्मक चर्चा करून ग्रामपंचायत प्रशासनाने या मार्गांवर बसणारा बाजार पुढील आठवड्या पासून मुख्य बाजारपेठेत स्थलांतरित करण्यात येईल असे नागरिकांना आश्वासन दिले.
यावेळी मा.सभापति संजय ठाकरे, प.स.सदस्य देवेंद्र गांगुर्डे,शाम पगारे, रिकपशेठ जैन, संजय भामरे,स्वामी खरोटे,अनुशेट ,दिनेश जैन,विजय लोखंडे,मनोज खैरनार, धर्मेंद्र लोखंडे, योगेश कोठावदे,मनोज चित्ते,विजय दशपुते, बाळा ओझरकर,संदेश कोठावदे आदींसह गावातील नागरिक व व्यापारी बांधव उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
1:48 am, January 14, 2025
temperature icon 19°C
साफ आकाश
Humidity 43 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!