DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : साक्री तालुक्यातील आदर्श गांव शेवाळी(दा) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ह.भ.प.अशोक भगवान साळुंके (अशोक तात्या) तात्या यांना वारकरी सेवा मंडळ धुळे यांचा २०२२ वर्षाचा जेष्ठ वारकरी पुरस्कार जाहीर झाला असून दि १८ डिसेंबर २०२२ रोजी धुळे येथे प्रदान केला जाणार आहे, तात्या म्हणजे एक निगर्वी प्रेमळ,भावनाशील,माणूस जवळपास ५० वर्षांपासून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून गावाची परिसराची निस्वार्थ सेवा केली कधीही कुणाचा द्वेष मत्सर न करता प्रामाणिकपणे वारकरी सांप्रदायाची पताका लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले आणि त्याचेच फलित म्हणजे आज गावात ५० च्या वर वारकरी असून भजन, कीर्तन, पालखी सोहळा आणि विशेष म्हणजे ह्यावर्षी निवृत्तीनाथपायी दिंडी निमित्ताने होणारा फिरत्या नारळाचा भव्य दिव्य कार्यक्रम शेवाळी(दा)पुण्यनगरीत होणार आहे, नवोदित वारकरी तयार होण्याचे पूर्ण श्रेय तात्यासाहेब यांनाच जात तात्या अतिशय योग्य निवड झाली असून आजपर्यंत केलेल्या सेवेचा हा खरा प्रसाद आहे .
तात्यांना जेष्ठ वारकरी पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल शेवाळी येथील ग्रामस्थांकडून शुभेच्छा देण्यात येत आहे
तात्यांचे शिष्य आदर्श शिक्षक संतोष नांद्रे, सुरेंद्र नेरकर आदि यांनी अभिनंदन केले.