DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – उमेश महाजन
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाटा ते दूई दरम्यान केवळ आठ दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या मुलीच्या प्रियकराने पतिवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना काल घडली. यासंदर्भात रात्री उशिरा नोंद करण्यात आली असून प्रियकरासह पत्नी अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत मध्यप्रदेशातील अंबाडा तालुका नेपानगर जिल्हा बऱ्हाणपूर येथील अरविंद रवींद्र सुलताने (वय 23 वर्षे ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे की , गेल्या आठ दिवसापूर्वी कुऱ्हा काकोडा येथील वर्षा बघे या मुलीशी लग्न झाले होते त्यानंतर काल चार रोजी फिर्यादी अरविंद सुलताने हा त्याच्या पत्नीला अंबाडा येथे सासरी घेऊन जात असताना रस्त्यातच पूर्णाड फाटा ते दूई दरम्यान त्यांची मोटार सायकल बिघाड झाल्याने ते त्या ठिकाणी थांबले.
त्या ठिकाणी वर्षा बगे हिचा प्रियकर शुभम भिसे हा आला आणि त्याने अरविंद सुलताने याच्या डोक्यावर लाकडी दांड्याने हल्ला केला.त्यात पती अरविंद सुलताने हा गंभीर जखमी झाला असून जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.दरम्यान शुभम भिसे व वर्षा बगे यांना अटक करण्यात आली आहे.तपास पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर करीत आहेत.