DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – उमेश महाजन
एरंडोल: येथे प्रतीवर्षाप्रमाणे पिर नत्थू बापू यांच्या उर्सानिमित्त पांडवनगरी उत्सव समिती तर्फे १ डिसेंबर २०२२ गुरूवार रोजी नत्थूबापूंच्या समाधीवर भगवी चादर चढविण्यात आली.
पांडववाड्यापासून भगवी चादर चढविण्यासाठी दर्ग्यापर्यंत वाजतगाजत मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील हे उपस्थित होते. युवा वर्ग मोठ्या संख्येने भगव्या टोप्या घालून सहभागी झाला होता.
छञपती शिवाजी महाराज व प्रभू श्रीराम यांचे छायाचित्र असलेले भगवे ध्वज मिरवणुकीतील युवकांच्या हाती होते तसेच नत्थू बापू यांच्या चादरीस भगव्या फुग्यांनी उत्कृष्ट रित्या सुशोभित करण्यात आले होते.
दर्ग्याजवळ मिरवणुक आल्यानंतर नत्थूबापूंच्या समाधीला भगवी चादर चढविण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख मान्यवर रमेश महाजन,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,राजेंद्र चौधरी,शालिग्राम गायकवाड,डॉ.हर्षल माने,अतुल महाजन,परेश बिर्ला,रवींद्र जाधव,कुणाल महाजन,रवींद्र दौलत पाटील,जहीरोद्दीन शे. कासम, पाटील,गोरख चौधरी,प्रशांत महाजन,मयुर महाजन, भोला पवार, नितिन बोरसे,कुणाल पाटील,आकाश महाजन,भूषण सोनार,मयुर बिर्ला,शेखर ठाकुर, भुरा पाटील,दिनेश महाजन,राजेश शिंपी,चिंटू साळी,बजरंग वाणी,उमेश साळी, किरण लोहार,राहूल लोहार, कैलास भोई,भूषण चौधरी, सत्यम परदेशी अमोल तांबोळी रोहित पवार आदी उपस्थित होते.
यावेळी एरंडोल पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल,सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहीरे,पोलिस हेड काँन्सटेबल अनिल पाटील यांनी दंगा नियंत्रण पथक व आपल्या सहकार्यांसह पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता.