DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी- उमेश महाजन
एरंडोल: विविध सामाजिक संस्थांचा सहभाग…
महाराष्ट्र राज्याने ज्यांच्या त्यागातून, परिश्रमातून व विचारातून पुरोगामीत्वाकडे वाटचाल केली अशा महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या विभूतींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ महात्मा फुले पुतळा येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला…
देशात नव्हे तर संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख महाराष्ट्र राज्याने निर्माण केलेली आहे आणि त्यात प्रामुख्याने या राज्यात जन्मलेल्या महापुरुषांचा व समाज सुधारकांचे मोठे योगदान राहिले आहे. पण त्यांच्याच बाबतीत सरकारच्या जबाबदार मंत्र्याने जाणीवपूर्वक आक्षेपार्ह वक्तव्य करणे हे अतिशय निंदनीय व समाजमनाच्या भावना दुखवणारे आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार सत्ताधाऱ्यांकडूनच अशी बेताल व बेजबाबदार वक्तव्य होताना दिसत आहेत. हे प्रकार असे सुरू राहिले तर राज्याची वाटचाल अराजकते कडे झाल्याशिवाय राहणार नाही याची राज्यकर्त्यांनी नोंद घ्यावी. आणि हे प्रकार त्वरित थांबवावे तसे न झाल्यास आगामी काळात यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला… महात्मा फुले युवा क्रांती मंच, समता परिषद,पंचशील मित्र मंडळ, सत्यशोधक परिषद व समस्त बहुजन समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले… यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन, माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, माजी नगरसेवक रुपेश माळी, महात्मा फुले युवा क्रांती मंचचे माजी अध्यक्ष कैलास महाजन, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन, शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, युवासेनेचे शहरप्रमुख प्रमोद महाजन, समता परिषदेचे शहराध्यक्ष सागर महाजन, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय भदाणे, सुदर्शन महाजन, अनिल महाजन, गजानन महाजन, युवराज महाजन, प्रल्हाद महाजन, संघरत्न गायकवाड, प्रा. आर एस पाटील, गोपाल महाजन, शरद चौधरी, कविराज पाटील, समाधान महाजन, कमलेश महाजन, राजधर महाजन, दिनेश महाजन, प्रसाद महाजन, जितेंद्र महाजन, सुनील महाजन, सुरेश महाजन यांच्यासह फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी उपस्थित होते….