नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे विठ्ठल पवार राजे यांच्या याचिकेला व सत्याग्रह आंदोलनाला यश

DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
राजगुरुनगर : राज्यातील कृषी पंप धारक शेतकऱ्यांवर बेकायदेशीरपणे लादलेली 39 हजार कोटी रुपयांची वीज बिल वसुली रोखली, संघटनेच्या विवीध आंदोलनातील ऐतिहासिक निर्णय.शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने विठ्ठल पवार राजे यांच्या नेतृत्वाखाली याचिका व सत्याग्रह आंदोलनामुळे…
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेची कायदेशीर लढाई व सत्याग्रह आंदोलनाला अभूतपूर्व यश. हा शेतकरी चळवळीचा देशातील सर्वात मोठा विजय, संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक व उच्च न्यायालय व राज्य अन्न आयोगाकडील याचिकाकर्ते विठ्ठल पवार राजे यांची माहिती
नमस्कार शेतकरी भावांनो बहिणींनो….
सोशल मीडिया प्रिंट मीडिया युट्युब चॅनेल आणि इतर प्रसार माध्यमांत माध्यमातून तुम्हाला आनंदाची आणि कायमस्वरूपी मिळवलेल्या यशाबद्दल ची बातमी सांगताना मला मनापासून चा आनंद होतो आहे. शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेची राज्यभरातील सत्याग्रह आंदोलन व कायदेशीर लढाई, सत्याग्रह आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. हा शेतकरी चळवळीचा देशातील सर्वात मोठा विजय, संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक व उच्च न्यायालय व राज्य अन्न आयोगाकडील याचिकाकर्ते विठ्ठल पवार राजे यांचे नेतृत्वाखाली झालेल्या राज्य अन्न आयोग मुंबई उच्च न्यायालय व सत्याग्रह आंदोलनामुळे राज्यातील कृषी पंप धारक शेतकऱ्यांना 39 हजार कोटी रुपयांची बेकायदेशीर विज बिल वसुलीला संघटनेने स्थगिती मिळवलेले आहे हा आनंद दिवाळीमध्ये सर्व शेतकऱ्यांसोबतच श्रद्धे शरद जोशी यांना समर्पित केला आहे हा मोठा विजय हा संघटनेच्या माध्यमातून मिळवला आहे याचा मला मनापासून चा आनंद आहे.
गेल्या तीन साडेतीन दशकांपासून सामाजिक शेतकरी चळवळीमध्ये काम करत असताना राज्यातील आणि देशातील अनेक ठिकाणी मला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध मागण्याच्या संदर्भात आंदोलन करण्याचं संधी मिळाली त्यामुळे माझी देशभरातील सामाजिक क्षेत्रामध्ये यापूर्वी बऱ्यापैकी ओळख झालेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेळा शेतकरी कष्टकरी कामगार सहकार बचाव आंदोलनातून विविध प्रकारच्या मागण्यांच्या संदर्भात संधी मिळाल्या त्या 1991, 1996,97, एक 1999ते 2000, 2002नंतर 2004 आणि 2007 तर 2008-09, 2011, 2012, 2013 आणि 2014-15, 2016या आंदोलनाच्या नंतरच्या काळामध्ये मध्यंतरी 2017-18, आणि कोविड19. मुळे 2019,20,21 आणि आता 2021 दुध दर आणि 2022 हजारो कोटीची ऊस बिल एफ आर पी 15 टक्के व्याज आणि आत्ता जस्ट 21-10-2022 आणि 10-12-2022 रोजी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे अनैतिक बेकायदेशीर पणे लावलेल्या 39हजार कोटी रुपये विज बिल वसुलीला स्थगिती मिळवली!
माझ्या भावांनो बहिणींनो आणि वडीलधाऱ्यांना अशा विविध आंदोलनामध्ये माझ्या हातून शेतकऱ्यांची सेवा घडली ती केवळ माझे श्रद्धेय आई-वडील नामदेवमालक पवार आणि माझे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील गुरु आणि माझे नेते श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी साहेब, श्रद्धेय रवी देवांग भाऊ यांच्यामुळे…
ती जी वरील आंदोलनाची मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ती माझ्या वैयक्तिक नेतृत्वाखाली माझ्या असंख्य सहकार्यांसोबत केलेली आंदोलन आहेत त्यामध्ये सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरलेली वरील आंदोलनाची मी थोडक्यात माहिती दिलेली आहे. त्यामध्ये आत्ता महाराष्ट्र राज्यातील सव्वा दोन कोटी कृषी पंप सातबारा धारक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज बिल वसुलीला मिळवलेली स्थगिती आदेश तुमच्या हातामध्ये देताना मला मनापासून चा आनंद होत आहे, तुमच्या सर्वांच्या हितासाठी एक मोठा आंदोलन हातामध्ये घेतलं आणि त्याचा विजय हा जवळपास महाराष्ट्रातल्या सव्वा दोन कोटी शेतकऱ्यांना झाला आणि तो विजय आणि तो निर्णय मी आपल्या सर्वांचे नेते माझे नेते माझे सामाजिक गुरु आणि शेतकऱ्यांचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी साहेब यांच्या चरणी मी समर्पित केला तो निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कृषी पंप धारक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला जे वीज कनेक्शन आहे आणि त्याची जी थकबाकी आहे ती 39 हजार कोटी रुपयाची अनैतिक वेग बेकायदेशीर लाडलेली विज बिल वसुली रोखण्यात मला 21 ऑक्टोबर 2022 रोजी माझ्या सर्व सहकारी माझे वकील अजय तल्हार साहेब आणि त्यांची सर्व टीम यांच्यामुळे शक्य झाला आणि तो आदेश मी श्रद्धे शरद जोशी यांच्या चरणी समर्पित केला याचं मला इतका आनंद आहे की माझ्यावरून किमान दोन-चार वेळा खासदारकी आणि आमदारक्या उतरून जरी टाकले असत्या मला इतका आनंद कधी झाला नसता एवढा आनंद मला या वीज बिल वसुलीला स्थगिती मिळवली आणि तीही कायदेशीरपणे मिळवली आणि यावरील सर्व स्थगिती आणि आदेश या संघटनेचे आणि चळवळीच्या नावावरती कोर्ट, आयोग, शासन आदेश परिपत्रक आणि शासन आदेश निघाले याचा जास्त आनंद मला या आंदोनामध्ये आहे.
त्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी कष्टकरी कामगार यांना मी विनंती करेन की सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काम करणारी संघटना ही शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना राष्ट्रीय राज्य स्तरावर कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्याच्या 355 तालुक्यांमध्ये शरद जोशी विचारमन शेतकरी संघटनेची शाखा आहे आपण या चळवळीमध्ये कुठल्या ना कुठल्या शाखा स्थापन करून आपण त्या या शेतकरी योग्य दिशेच्या आणि रास्त कार्यक्षम असलेल्या चळवळी सहभागी व्हा असं सांगताना देखील मला आनंद होत आहे आणि आपण निश्चितपणे या लढाईमध्ये जवळपास सव्वा दोन कोटी शेतकऱ्यांनी मला संपर्क केलेला आहे माझे व्हिडिओ युट्युब फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूज पेपरच्या माध्यमातून ज्यांनी छापले त्यांचे अभिनंदन आणि जे नाही छापले त्यांचे जास्त अभिनंदन करताना देखील मला खूप आनंद होत आहे की सर्व शेतकरी कष्टकऱ्यांनी कामगारांनी शरद जोशी विचार मन शेतकरी संघटनेचे ऑनलाईन सभासद व्हा आणि संघटनेच्या या चळवळीमध्ये सहभागी होऊन राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांना सुखाने आणि सन्मानाने जगण्याचा मार्ग मिळवून देण्याच्या या ऐतिहासिक लढाईचे लढाईमध्ये सहभागी झालात तर इतिहासामध्ये तुमच्या नावाची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही एवढा मला विश्वास आहे.
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना ही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर देश पातळीवर कार्यरत असणारी बिगर राजकीय संघटना आहे ही संघटना कुठल्याही पक्षाच्या बांधिलकीमध्ये न राहणारी चळवळ असून ग्लोबल ऍग्रो फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य किसान महामंडळ महाराष्ट्र राज्य, महिला किसान महामंडळ महाराष्ट्र राज्य,. आणि महा ऍग्रो फार्मफुड सोल्युशन फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड च्या माध्यमातून ही चळवळ देशभर कार्यरत आहे आपण या कार्यक्षम चळवळीमध्ये सहभागी व्हाल तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या जीवनाचे सार्थक करून घ्याल अशी मला अपेक्षा वाटते म्हणून हा पत्र प्रपंच मी माझ्या वर्तमानपत्राचे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या पुढे ठेवत आहे.
पुन्हा एकदा मी सर्व शेतकरी कष्टकरी बांधव मायमाऊल्यांना आपणा सर्वांच्या लक्षात राहावे म्हणून आठवण करून देत आहे की राज्यातील कृषी पंप धारक शेतकऱ्यांकडून बेकायदेशीर वसूल करत असणारी चुकीच्या पद्धतीची वीज बिल वसुली थांबवण्यामध्ये संघटना आणि माझी सर्व टीम शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना टीम, वकील टीम माझे सर्व बाहेरील सर्व सम विचारी संघटनातील टीम या सर्वांचे योगदान याच्यामध्ये आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देईल आणि बेकायदेशीरपणे महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पादक शेतकऱ्यांकडून वसूल करणारी कृषी पंपाची वीज बिल वसुली सुमारे 39 हजार कोटी रुपयांच्या वसुलीला कायदेशीर पने स्थगित मिळवलेली आहे हा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचा मोठा विजय आहे, शेतकऱ्यांचा विजय आहे. आणि शेतकऱ्यांनी संघटनेचा पुढील आदेश येईपर्यंत आमची राज्य सरकार सोबत महावितरण सोबत अधिकृत बैठक होऊन त्या बैठकीमध्ये ज्यांचं येणं ज्यांचं देणं लागतं त्या हिशोबानी ते सर्व आदेश निर्गमित होतील त्यानंतर कोणी कोणाला पैसे भरायचे असा विषय समोर येईल परंतु मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की तुम्ही सर्वजण जर आमच्या पाठीशी उभा राहिला तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना येत्या काही महिन्याच्या कालावधीमध्ये कृषी पंप धारक शेतकऱ्यांना मोफत वीज मिळण्याच्या संदर्भामध्ये संघटनेचा यशस्वी प्रयत्न राहीलच त्यासोबत शेतकऱ्यांच्या शेत घराला 300 युनिट पर्यंतची दिवाबत्ती म्हणून वीज मोफत राहील. कष्टकरी आणि कामगार यांच्यासाठी 200 युनिट पर्यंतची घरगुती वापरासाठीची वीज मोफत राहील असा आदेश करण्यामध्ये संघटनेला यश हे येईलच पण त्या यशाचे शिल्पकार त्या लढाईमध्ये आपणा सर्वांचा सहभाग राहावा म्हणून आपण संघटनेमध्ये सभासदत्व नोंदवा सभासद व्हा आपापल्या गावात तालुक्यात जिल्ह्यात शाखा काढा आणि एक शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या हितामध्ये काम करणाऱ्या चळवळीमध्ये सहभागी व्हा. एवढी अपेक्षा या निमित्ताने करतो आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, धन्यवाद जय किसान, जय जवान, जय महाराष्ट्र जय भारत.
लेखक शेतकरी आंदोलनाचे पाईक किसान सेवक.
विठ्ठल पवार राजे
अध्यक्ष शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना, संपूर्ण भारत. महाराष्ट्र राज्य.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:33 pm, January 14, 2025
temperature icon 30°C
साफ आकाश
Humidity 31 %
Wind 12 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!