DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – किशोर महाले
धुळे:- विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त समस्त माळी समाज मंडळ जुने धुळे, माळी समाज सेवा प्रतिष्ठान धुळे, ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन यांच्यावतीने भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक दिलीप आप्पा देवरे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
दि.03 जानेवारी 2023 रोजी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती निमित्ताने जुने धुळे सुभाष नगर येथे महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी महिलांनी या रांगोळी स्पर्धेत सहभाग घ्यावा ही विनंती.
सदर रांगोळी स्पर्धेत तीन गट तयार करण्यात आले आहे.
गट – अ – (वयोमर्यादा 10 ते 20 वर्ष) प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस – पैठणी
गट – ब – (वयोमर्यादा 21 ते 35 वर्ष) प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस – पैठणी
गट – क – (वयोमर्यादा 36 ते पुढे ) प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस – पैठणी
याप्रमाणे विजेत्या महिलांना पारितोषिके वाटप करण्यात येतील सदर रांगोळी स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली आहे. स्पर्धेचा दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी दुपारी 01 वाजता, स्थळ- कुंभार खुंट जुने धुळे, पारितोषिक वितरण 3 जानेवारी 2023 रोजी दुपारी 03 वाजता विश्वकर्मा भवन कुंभार खुंट जुने धुळे येथे आयोजित केले आहे. तरी महिलांनी या रांगोळी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असेही आव्हान कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक दिलीप आप्पा देवरे यांनी केले आहे.