नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शेवाळी(दा)येथे फिरत्या नारळाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न ; लाखो भाविकांनी घेतला लाभ

DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी:- अकील शहा

शेवाळी[दा.] (जि.धुळे) : दि.२१ डिसेंबर २०२२वार बुधवारी रोजी ‘आकाशात फडकणाऱ्या भगव्या पताका… संपूर्ण गावात करण्यात आलेली लाइटिंग ची रोषणाई ,टाळमृदंगाचा निनाद… माउली नामाचा गजर आणि शेवाळी(दा) गावाला आलेले प्रतीपंढरपूरचे स्वरूप’ अशा आनंदायी वातावरणात जायखेडा येथील प. पू. संतश्री कृष्णाजी माऊली जायखेडकर यांनी ५० वर्षांपूर्वी सुरु केलेला फिरत्या नारळाचा कार्यक्रम माउलींच्या कन्या यशोदा आक्का जायखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेवाळी (ता.साक्री) येथे भक्तिपूर्ण वातावरणात झाला. या वेळी महाराष्ट्रातील लाखो वारकरी बांधवांनी हजेरी लावली होती,शेवाळी गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते

सकाळी श्रीक्षेत्र आळंदी येथून माउलींच्या पादुका आणल्यानंतर पादुकांची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. यात विद्यार्थीनिंनी डोक्यावर कलश, तुळशी वृंदावन घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली. प्रत्येक घरापुढे गुढी उभारण्यात आली होती. अंगणात विविध प्रकारच्या शोभिवंत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सर्व मंदिरांना रंगरंगोटी करण्यात आली होती. प्रसंगी गावात एकप्रकारे देव अवतरल्याची अनुभूती भाविकांच्या प्रसन्न भाव मुद्रेवर स्पष्ट दिसून येत होती. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमासाठी वारकरी संप्रदायातील या कार्यक्रमाला पुढील प्रमाणे संतवृद उपस्थित होते :-
*ह.भ.प.वैराग्यमूर्तीस तुकाराम बाबा,गोराणेकर,ह.भ.प. शांतीसागर जयराम बाबा, गोंडेगांवकर, ह.भ.आचार्य हरिभाऊ महाराज तळवाडे भवाडे, ह.भ.प. विश्वनाथ नाना महाराज, तळवाडे दुंधे, ह.भ.प.भाऊसाहेब महाराज शास्त्री, वाराणसी,ह.भ.प. अशोकभाऊ महाराज, भीमाशंकर, मठाधिपती महंत श्री १००८ प्रवणगिरीजी बाबाजी श्री क्षेत्र नागाई योगी दिनानाथ गुरुगहिनीनाथजी गोरक्षनाथ मंदिर कळंभीर आदि.*

दुपारी १२ते ४ माऊलींचा रथ व पादुकांची मिरवणूक काढण्यात आली, दुपारी २ ते ८ दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,दुपारी ३:३० ते ४:३० ह.भ.प. विश्वनाथ नाना महाराज तळवाडेकर यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते,संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ व गीतापाठ होईल, रात्री ८ ते ८:३० श्री. निवृत्तीनाथ महाराज यांचे पदयात्रेचे नियोजन करण्यात होते,रात्री ९ ते ११ वाजता श्री.ह.भ.प. एकनाथ महाराज चतर शास्त्री आळंदी यांचे जाहीर कीर्तन कार्यक्रम झाले,या कार्यक्रमाला राज्यभरातील लाखो भक्तांनी लाभ घेतला.

माउली शब्दाचे महत्व अधोरेखीतप्रसिद्ध कीर्तनकार न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री भगवानगड (बीड) यांनी आपल्या कीर्तनातून ‘माउली’ शब्दाचे महत्व पटवून दिले. आजपर्यंत माउली फक्त संत ज्ञानेश्‍वर महाराजांना संबोधतात व त्यानंतर कृष्णाजी माउली यांना ‘माउली’ पदवी दिली. आई ज्याप्रमाणे मुलांना मायेने वाढविते. तेवढी माया जगात कोणीच लावू शकत नाही. म्हणून आईला माउली म्हणतात. त्याच अनुषंगाने आई इतकी माया आपल्या वारकरी परिवारावर कृष्णाजी माउलींनी केली. म्हणून लोकांनी त्यांना माउली पदवी बहाल केल्याचे महाराजांनी कीर्तनात नमूद केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ,ह.भ.प. भजनी मंडळ, ग्रामपंचायत(शेवाळी), ग्राम सुधार मंडळ, विविध विकास कार्यकारी सोसायटी, स्वयंमसेवक, शालेय विद्यार्थी आदि यांनी मेहनत घेतली होती.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:38 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 33 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!