DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी :- किशोर महाले
धुळे : मालेगाव शहरांमध्ये सुप्रसिद्ध कथाकार परमपूज्य श्री प्रदीप जी मिश्रा महाराज यांच्या मधुर वाणीने श्री शिव महापुराण कथा वाचनाचा कार्यक्रम होणार आहे.सदर कार्यक्रमासाठी धुळे शहर व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भक्त हे मालेगाव येथे जाणार आहे. श्री शिव महापुराण कथा कार्यक्रमांत जाणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा समावेश आहे. सदर कथा श्रवणाचा व महापुराणाचा कार्यक्रम हा दिनांक 23/12/ 20122 ते 29/12 /20122 या कालावधीत मालेगाव येथे होणार आहे.
सदर कालावधीत कथा श्रवणासाठी जाणाऱ्या शिवभक्तांना टोल माफी द्यावी, त्यांच्या गाड्यांना अडू नये अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अवधान टोल नाका येथील व्यवस्थापकाकडे करण्यात आली. सदर मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने टोल प्रमुखांची भेट घेतली. सदर कथेसाठी जाणाऱ्या वाहन चालकांनी आपल्या वाहनावर शिव महापुरान असे स्टिकर लावावे. असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे.
यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, मंगेश जगताप, भिका नेरकर, जितेंद्र पाटील, उमेश महाले, भटू पाटील, राजू चौधरी, निलेश चौधरी, दीपक देसले, गोलू नागमल, रामेश्वर साबरे, दिनेश चौधरी, स्वामिनी पारखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.