DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी :- राहुल राठोड
धुळे : 2011 पासून संग्राम प्रकल्प व सध्या अस्तित्वात असलेले आपले सरकार प्रकल्पात सुमारे 27000 ग्राम पंचायत संगणक परिचालक हे कार्यरत असून राज्यातील सुमारे 6 कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा संगणक परिचालक देत असून डिजिटल इंडिया व पेपरलेस ग्राम पंचायत करण्याच्या दिशेने अविरत प्रामाणिक पणे काम करत आहेत परंतु अनेक वर्षांपासून ग्राम पंचायत मधे काम करत असून सुद्धा सीएससी कंपनी मार्फत फक्त 7000 रू एवढे तुटपुंजे मानधन दिले जात आहे तरी तुटपुंजे मानधन न देता शासनाने संगणक परिचालक यांना 2018 यावलकर समितीच्या अहवालानुसार सुधारित ग्राम पंचायत आकृतीबंध मधे पद निर्मिती करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक आहे अश्या विविध मागण्यासाठी संघटनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलन काढण्यात आले असून सध्या सुरू असलेल्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर दि. 26/12/2022 पासून मोर्चा धडकणार आहे त्या संदर्भात तालुका व्यवस्थापक पंचायत समिती साक्री येथे निवेदन देतांना तालुका अध्यक्ष अंबालाल नेरकर, उपाध्यक्ष विशाल साई, सचिव प्रदीप भदाने, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ पिसाळ, दीपक भामरे, साहेबराव कारंडे, कैलास जाधव, छोटिराम भोये, वहाब मिर्जा, धनराज बागुल, सोनू वाघमोडे, वसीम मंसुरी, सुनिल मारणर ,यशवंत सूर्यवंशी जीवन गांगुर्डे, प्रमोद सोनवणे, लता शिंदे, कविता देवरे, शितल शेवाळे आदी उपस्थित होते.