DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: – मनोहर गोरगल्ले
राजगुरुनगर (दि-३०डिसेंबर)खेड तालुक्यातील पुर्व भागातील जऊळके बुद्रुक, चिंचबाईगाव, गुळाणी, वाकळवाडी, गाडकवाडी, वरुडे, चौधरवाडी, कन्हेरसर, पूर, गोसासी, रेटवडी, निमगाव या गावांमध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्याकडून दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व वाफगावचे उपसरपंच अजय भागवत, ॲड सुखदेव तात्या पानसरे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड पोपटराव तांबे पाटील, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष ॲड अरुण मुळूक, ॲड माणिक वायाळ,वरुडे गावचे सरपंच मारुती थिटे, वरुडे गावचे उपसरपंच अविनाश चौधरी, वाफगाव विकास सोसायटीचे चेअरमन गोपाळ टाकळकर, वरुडे विकास सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण चौधरी, जऊळके गावचे सरपंच अरुण येवले, गाडकवाडीचे उपसरपंच काळूराम घाडगे, वाफगावचे ग्रामपंचायत सदस्य अमोल कराळे, पूर गावच्या सरपंच प्रतिभा गावडे, कन्हेरसर गावच्या सरपंच सुनीता केदारी, माजी पंचायत समिती सदस्य सुदाम माशेरे, युवा नेते यतीन टाकळकर, चिचबाई गावचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब रणपिसे, तानाजी रणपिसे, विजय रणपिसे, ॲड अतुल गोरडे, ॲड सचिन पवळे, ॲड अमोल टाकळकर, ॲड निलेश पवळे, ॲड बिभीषण पडवळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या सहा वर्षांपासून दरवर्षी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्याकडून सातत्याने दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येते. या वर्षीही नवीन वर्ष सुरू व्हायच्या आधी 2023 दिग्दर्शिकेचे वाटप होऊन प्रत्येकाला दिनदर्शिका मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.