दहाव्या नंतर प्रेत जिवंत झाले रक्ताच्या थारोळ्यातील प्रेम कहानी
प्रतिनिधी:- आरिफ भाई शेख
पुणे : आळंदी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद असलेल्या गुन्ह्याचा आश्चर्यकारक छडा लावत स्वतःच्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे, याबाबत माहिती अशी की सुभाष छबन थोरवे व 58 रा.चऱ्होली खुर्द ता.खेड याचा आकस्मिक मृत्यू म्हणून सीआरपीसी प्रमाणे आळंदी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होता, परंतु प्रेताला शीर नसल्यामुळे, तसेच दि.19/12/2022 रोजी रवींद्र घेनंद मिसिंग केस या दोन्हीचा तपास करत असता असे निदर्शनास आले की इसम नामे सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे यांने, प्रेमिका लिलाबाई जाधव हिचे सोबत लांब कुठेतरी जाऊन राहण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला,नातेवाईकांनी कपड्यावरून प्रेताची ओळख पटल्यानंतर शहरांमध्ये दहाव्याचे बोर्ड ही लागले दशक्रिया विधीही झाला, परंतु प्रेताला शिर नसल्याचा तपास करत असता आजूबाजूला ऊस असल्याने जंगली जनावरांनी शिर नेले किँवा कसे याबाबत एक शून्य शून्य ची सुई सगळीकडे फिरत होती, अधिक तपास केला असता मयत चा बनाव केलेला सुभाष छबन थोरवे यांनी रवींद्र घेनंद रा, धानोरे यास खून करण्याच्या इरादेणे त्याची प्रेमिका लिलाबाई जाधव हिच्या मदतीने शेतात बोलवले, कोयत्याने त्याचे मुंडके उडवून, त्याच्या अंगावर स्वतःचे कपडे चढून ते मृत्यू झालेले शरीर रोटर घालून फिरवले आणि अपघातात स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव केला, पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेताचे मुंडके, कपडे,गुन्ह्यात वापरलेला कोयता, हा लपवून ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला,आपल्या चुलत बहिणीकडे अचानक सुभाष थोरवे गेला असता ग्रामस्थांनी चोर समजून त्याला चोप दिला, तेव्हा त्याने मी थोरवे आहे असे सांगितले मृत झालेली व्यक्ती समोर पाहून त्याची चुलत बहीण चक्कर येऊन कोसळली असाच आश्चर्याचा धक्का सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे यांच्या घरच्यांनाही बसला, सुभाष छबन थोरवे याचे लिलाबाई जाधव या महिलेशी प्रेम संबंध होते लिलाबाई जाधव सोबत कुठेतरी लांब निघून जाण्यासाठी त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव केल्याचे दिनांक 26 12 2022 रोजी पोलीस तपासात कबूल आरोपी ने केले आहे, मोठ्या शिताफीने रवींद्र घेनंद याचा खून करून, त्याच्या अंगावर स्वतःचे कपडे चढवून ते प्रेत सुभाष थोरवे चे आहे असा बनाव त्याने स्वतःच केला, परंतु कानून के हाथ लंबे होते है ….याचा परिचय येत पोलिसांनी मोठ्या हुशारीने सुभाष छबन थोरवे याचा कबुली जबाब घेतला आहे,दरम्यान सुभाष छबन थोरवे हा मृत झाल्याचे गृहीत धरून त्याच्या नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये मृत म्हणून दशक्रिया विधीसाठी फलकही लावले होते,तसेच अंत्यविधी आणि दशक्रिया विधी हि केला होता, हे सर्व घडले असताना पोलिसांना मिसिंग केसची दखल घेत तपास करत असताना शेलपिंपळगाव येथे हा अचानक मिळून आला,त्यामुळे चित्रपटात शोभेल अथवा चित्रपटालाही लाजवेल अशा या खुणाच्या प्रकरणात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत, सदर प्रकरणांमध्ये गुन्हा रजी.नं.389/2022 प्रमाणे भा दं वि 302 भा दं वी 201 प्रमाणे गुन्हा दाखल करून कोर्टात आरोपीला सादर करण्यात आले आहे, निखिल रवींद्र घेनंद यांनी याबाबत फिर्याद दिली,असून त्यानुसार आरोपीस अटक करण्यात आली आहे,पुढील तपास चालू आहे, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे. पोलीस सह आयुक्त मनोज लोहिया अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडल 1 चे विवेक पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग श्रीमती प्रेरणा कट्टे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे पोलीस निरीक्षक आर जे पाटील गुन्हे पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर बी एम जोंधळे म पो सई माने सायकल टोके पोलिसावलदार शेंडे पोलीस नाईक कोरे पोलीस नाईक बांगर पोलीस हवालदार लोणकर पोलीस कॉन्स्टेबल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे पोलीस कॉन्स्टेबल गजरे पोलीस कॉन्स्टेबल आडे पोलीस कॉन्स्टेबल पालवे यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.