DPT NEWS NETWORK ✍️
Dhule : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संकल्प वाचनालय धुळे येथे महिलांचा पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
डॉ सौ.निशा व डॉ. सुशिल महाजन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किरण अध्यापक विद्यालय कापडणेचे चेअरमन सौ. नलिनी व श्री. वामनराव जाधव होते
कार्यक्रमाच्या सुरूवातीस अद्य
शिक्षिका माईसाहेब सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन
करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकल्प
वाचनालयाचे संचालक आप्पासो.
बी एन बिरारी यांनी केले त्यांनी
सावित्रीबाईंच्या कार्यास उजाळा देतांना सांगितले की विविध क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने योगदान देण्याची संधी
मिळते आहे ते शिक्षणाच्या बळावर मिळते आहे हि पुण्याई
त्या मावलीची आहे सावित्रीबाईं व
महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री
शिक्षणासाठी घेतलेले अपार कष्टाला आज फळे आलीत
यावेळी एकवीरा हायस्कूलच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुलेंचे पुस्तक देऊन या उपस्थित महिलांच्या हस्ते डिंपल शिरसाठ, पूर्वा बागुल, निरक पाटील, भूमिका पाटील, विभूती जोशी, मिताली ठाकरे, वैभवी अहिरराव, कृष्णाली खैरनार, दिव्यांनी भालेराव, सायली मोरे यांना सन्मानित करण्यात आले डॉ.निशा महाजन, सौ.जया माळी, सौ.नलिनी जाधव, सौ.संध्या बिरारी, सौ.राजश्री माळी, अॅड.अरुणा महाजन, सौ.कौशल्याबाई रोकडे, सौ.स्नेहल वाणी, सौ.निशा सूर्यवंशी ज्यांच्या हस्ते करण्यात आला.
या विविध क्षेत्रातील महिलांचाही
वाचनालयाचे अध्यक्षा सौ.जया माळी व डॉ.निशा
महाजन यांच्या हस्ते पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला
याप्रंसंगी डॉ निशा व डॉ सुशिल महाजन यांच्या ही वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला
कार्यक्रमासाठी पुस्तके आबासाहेब चैत्राम बळीराम भदाणे यांनी पुरविली होती
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून डॉ. सुशील महाजन श्री वामनराव जाधव, श्री. बी एन बिरारी श्री देवेंद्र पाटील श्री राजेंद्र गवळे श्री प्रशांत माळी श्री ज्ञानेश्वर महाजन श्री आसाराम माळी श्री देवीदास माळी श्री मुकुंद महाजन श्री प्रवीण माळी श्री ज्ञानेश्वर माळी चि. गणेश माळी श्री किशोर माळी श्री दीपक माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
आभार प्रदर्शन करतांना वाचनालयाचे प्रमुख ज्ञानेश्वर माळी यांनी अहिराणी भाषेतून
सावित्रीबाई फुलेंचे कार्य सांगितले
विशेषताहा महिला मुलींनी त्यांचा
त्याग व बलिदानाची सतत जानिव ठेवावी महीला घराची चौकट ओलांडून विश्वात भरारी
घेते आहे हि फक्त सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले
यांचीच पुण्याई आहे…