DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: युवराज पाटील.
धुळे – धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या विरोधात शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी अंदाधूंद कारभार करीत आहे. आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचार माजलेला आहे. आरोग्य विभागामधील कर्मचारी हे शहरामधील पिसाळलेले कुत्रे, अस्वच्छता, घाण या गोष्टींकडे सपशेल दूर्लक्ष करीत आहे. आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये फवारणीचा करोडो रुपयांचा ठेका दिला आहे. परंतू कुठेही फवारणी केली जात नाही. त्याचप्रमाणे आरोग्य विभागामार्फत करोडो रुपयांचा मनूष्यबळ पुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला आहे. त्यामध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचारी संगनमताने भ्रष्टाचार करीत आहे. काम न करता कंत्राटी कर्मचा·याचा पगार काढला जात आहे. त्यामध्ये कमिशन घेतले जात आहे.
अशा विविध आरोग्य विभागाच्या प्रकरणांमध्ये अनियमियता, भ्रष्टाचार, बेकायदेशीर कामे सुरु आहेत. शहरातील पिसाळलेल्या कुत्र्यांना त्वरीत पकडावे, शहरातील घाण कचरा साफ करावा. शहरामध्ये फवारणी सुरु करावी. या मागणीसाठी धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. यावेळी रणजीत राजे भोसले, रईस काझी, महेंद्र शिरसाठ, राजेंद्र सोलंकी, संजय माळी, भिका नेरकर, मंगेश जगताप, राजू डोमाळे, किरण बागूल, हर्षल भामरे, हाशीम कुरेशी, असलम खाटीक, सोनू घारु, कुणाल पवार, शोएब अन्सारी, अमित शेख, एजाज शेख, जिद्या हाजी, जयदिप बागूल, राजेंद्र चौधरी, रईस शेख, नजीर शेख, जितू पाटील, सागर चौगुले, दिपक देसले, राहूल पोळ, श्रृतीक पोळ, भूषण पाटील, चेतन पाटील, रामेश्वर साबरे, कल्पेश मगर, शेख समद, उमेश महाजन, दिपक देवरे, शोएब अन्सारी, ताईर शेख, सोनू शेख, दत्तू पाटीक, भटू पाटील, गोलू नागमल, निखिल मोमया, निलेश चौधरी, रियाजिद्दीन शेख, शेखर सोनवणे, मसूद अन्सारी, स्वामिनी पारखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.