DPT NEWS NETWORK ✍️
दहिवेल प्रतिनिधी
राहुल राठोड
धुळे : धुळे सुरत नॅशनल हायवे वरील दहिवेल गाव हे मोक्याचे ठिखान येथे नेहमी परिसरातील लोकं नाशिक, धुळे, सुरत, नंदुरबार येथे जाण्यासाठी उभे राहतात परंतु गेल्या एका वर्षांपासून दहीवेल उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे दहीवेल फाट्यावर खूप मोठया प्रमाणावर धूळ उडते त्या धुळीचा परिसरातील नागरिक, स्थानिक रहिवाशी, व्यावसायिक बांधव व प्रवाश्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. तसेच अनेकांना श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागते आहे. परंतु रस्त्याचे काम करणारी संबंधित यंत्रनेचे या कामा कडे अतिशय दुर्लक्ष आहे. उड्डाणपुलाचे काम थांबल्यामुळे रस्त्याची अतिशय भयानक दुर्दशा झालेली आहे. आता तर या रस्त्यावरील खड्यांमुळे व मातीमुळे दहिवेल फाट्यावर चोवीस तास धुळीचे साम्राज्य असते. त्यामुळे गावातील व बाहेर गावावरून येणाऱ्या अनेक नागरीकांना श्वसनाचा त्रास व श्वसनासंदर्भात आजार उदभवायला लागलेले आहेत. धुळीचे प्रमाण एवढे वाढले आहे की दहिवेलचे ” धुळवेल ” मध्ये रूपांतर झाले आहे. सर्वसामान्य जनतेला एव्हढा त्रास होत असतांना देखील संबंधित यंत्रणेने मात्र अद्याप उड्डाणपुलाचे काम सुरु केलेले नाही या उड्डाणपुलाच्या कामाकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. व्यापारीदृष्ट्या अतिशय दळण वळणाचे गाव मात्र बाहेरुन येणारा नगरीक अतिश वाईट अनुभव घेऊन जात आहे. अनेकांना श्वसनासंदर्भात वेगवेगळे आजर उद्भवत आहेत. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक महिन्यांपासुन सदरील रस्त्यात खड्डे आहेत की, खड्यात रस्ता आहे हे नागरीकांना कळत नाही अशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे. त्यामुळे वाहनांचे देखील अतोनात नुकसान होत आहे टायर फुटण्याचे प्रमाण वाढलेले आहे. नाशिकहुन नंदुरबार जाण्यासाठी अनेक प्रवासी अंतर कमी असल्यामुळे दहिवेल मार्गाने जातात परंतू उड्डाणपुलाच्या अपूर्ण कामामुळे रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. त्यामुळे प्रवाशी देखील वैतागलेले आहेत. सदर रस्त्यात खड्डे पडल्यामुळे अनेकांना पाठदुखी , कंबरदुखी, या सारख्या आजारांना देखील सामोरे जावे लागत आहे. आता तर या समस्यांबरोबरच धुळीचे साम्राज्य दहिवेल मध्ये दिसत आहे. त्यामुळे ही देखील एक नविन समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे रस्त्या संदर्भात ज्या काही यंत्रणा असतील त्यांनी तात्काळ लक्ष घालून सदरील काम मार्गी लावावे अन्यथा दहीवेल फाट्याला धुळीचे पर्यटन स्थळ घोषित करावे व नागरिकांच्या आरोग्याची संबंधित यंत्रणेने जबादारी घ्यावी.