DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी : महेंद्रसिंग गिरासे
शिंदखेडा: अलाने गावातील केशरी रेशन कार्ड धारक यांना सरपंच प्रतिनिधी च्या अथक प्रयत्नाने अखेर रेशन मिळण्यास आज रोजी सुरुवात झाली सतत गेल्या दोन महिन्यापासून पाठपुरा करून सरपंच प्रतिनिधी श्री. संदीप गिरासे यांनी पुरवठा शाखा शिंदखेडा व जिल्हा पुरवठा शाखा धुळे यांच्या संपर्कात राहून लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून सर्व रेशन कार्डधारक यांना अखेर रेशन धान्य मिळण्यास आज पासून सुरुवात झाली एकूण 20 केशरी रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे वरील सर्व काढ धारकांनी सरपंच सौ.अरूनाबाई गिरासे व सरपंच प्रतिनिधी यांचे आभार मानले आहे.